हिंजवडीतील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’ ; दिल्लीतील ४ ‘माॅडेल’ची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीत मॉडेलिंग करणाऱ्या चौघांकडून वेश्या व्यवसाय करुन घेण्यात येत असल्याचा प्रकार हिंजवडी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार तरुणीची सुटका करुन पाच जणांना अटक केली आहे. मुळशी तालुक्यातील मारुंजी येथील लाईफ रिपब्लिक सोसायटीत हा प्रकार सुरु होता.

आर्यन उर्फ विश्वास बळीराम सावरगावकर (वय ३४, रा. शिवतीर्थनगर, कोथरुड), नितीन शरद भालेराव (वय २५, रा. लातूर), अभय सज्जनराव शिंदे (वय २५, रा. लातूर), मयुर गणेश शर्मा (वय २८, रा. भोपाळ) आणि दिलीप भागीरथ मंडल (वय २४, रा. नालासोपारा ईस्ट, वसई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, मुळच्या बिहार, छत्तीसगड तसेच नालासोपारा येथील या चार तरुणी दिल्लीत शिक्षण तसेच मॉडेलिंग करीत होत्या. त्यांच्यातील एक तरुणी इव्हेट मॅनेजमेंटचा कोर्स करीत आहे. आरोपींनी त्यांना जादा पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यात आणले. त्यांना ग्राहक मिळवून देऊन त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते. ही माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी लाईफ रिपब्लिक सोसायटीतील फ्लॅटवर छापा टाकून या चार तरुणी आणि पाच जणांना पकडले.