मुकुंद नगर दंगल: पोलिसांनी खोटी फिर्याद नोंदविली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – मुकुंद नगर येथे दोन गटात दंगल सुरू असताना नगरसेवक समद खान हे त्यांच्या मित्रासमवेत पुणे जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये जेवण करीत होते. तेथील सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध आहे. असे असतानाही पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात गोवले, अशी तक्रार समद खान यांच्या वकिलांनी आज दुपारी न्यायालयात केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुकुंदनगर भागात झालेल्या दोन गटातील भांडणात नगरसेवक समद खान यांचे नाव आले आहे. मात्र, त्या रात्री जेव्हा दोन गटात भांडण झाले. तेव्हा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्या वेळेला समद खान आणि त्यांच्याबरोबर असलेले इतर तीन मित्र पुणे जिल्ह्यातील एका हॉटेल मध्ये जेवण करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. मात्र या मध्ये पोलिसांनी दिलेल्या भूमिकेवर संशय घेऊन समद खान यांच्यावतीने न्यायालयात फिर्यादी पोलिसांच्या विरोधात ऍड. रोमन सय्यद यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे.

समद खान व त्यांचे मित्र भांडण झाले. त्यावेळेस मुकुंदनगरसह नगर शहरात हजर नसताना तसेच याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज पुरावे असूनही पोलिसांनी चुकीची फिर्याद नोंदविली असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कोर्टाने याबाबत तक्रार करा, असे सांगितल्याने ही तक्रार करण्यात आली आहे.