भाजपच्या ‘त्या’ महिला नेत्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी पोलिसांनी केला गुन्हा दाखल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा नेत्या स्मृती इराणी यांच्याबाबत आमदार जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्या विरुद्ध लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, पीपल्स रिपब्लिकन पाटीर्चे अध्यक्ष जयदीप कवाडे यांनी नागपुरातील बगडगंज भागात काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचार सभेत स्मृती इराणी ही मस्तकावर खूप मोठे कुंकू लावते, आम्ही माहीत केल्यावर कळले की, जेवढे तिचे नवरे, तेवढेच मोठे मस्तकावरील कुंकू असते. स्मृती इराणी लोकसभेत गडकरींच्या मांडीला मांडी लावून बसते आणि संविधान संशोधन करण्याची भाषा करते, आमच्या नाना पटोले यांनी स्मृती इराणीला थेट संसदेत संविधान बदलणे हे नवरे बदलण्याएवढे सोपे काम नाही, असा सवाल केला होता. असे वादग्रस्त वक्तव्य जयदीप कवाडे यांनी केले होते. त्यावेळी जयदीप कवाडे यांनी स्मृती इराणी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाविरुद्ध भाजप कार्यकर्त्यांनी लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुद्गल यांच्याकडे ही तक्रार आल्यानंतर त्यांनी ती आचारसंहिता कक्षाकडे पाठविली होती. या तक्रारीच्या आधारे पूर्व नागपूरच्या सह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लकडगंज पोलिसांत बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like