समाजवादी पार्टीचे खा. आझम खान जेलची ‘हवा’ खाणार ?, १३ प्रकरणात चार्जशीट दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांच्या अडचणींत आणखी वाढ होणार आहे. त्यांच्या रामपुर लोकसभा मतदारसंघात त्याच्याविरोधात आणखी १३ प्रकरणांत चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देखील त्यांच्याविरोधात १५ गुन्हे दाखल करण्यात आले होते. आचार संहिता उल्लंघन आणि भाषणांत आणि प्रचारादरम्यान आपत्तीजनक भाषेचा वापर केल्याप्रकरणी त्यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या १५ प्रकरणांत पोलिसांनी २ चार्जशीट याआधीच दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता उरलेल्या १३ प्रकरणांत चार्जशीट दाखल करण्यात आल्याने आझम खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. निवडणुकीदरम्यान आझम खान यांनी पंतप्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्याचबरोबर भाजप उमेदवार जयाप्रदा यांच्याविरोधात देखील त्यांनी अभद्र भाषेत टिप्पणी केली होती. या प्रकरणात पोलिसांनी आधीच चार्जशीट दाखल केले आहे. जयाप्रदा यांच्यावर टीका करताना आझम खान यांनी या रॅलीत टीका करताना म्हटले होते कि, ज्यांना आम्ही हाताला पकडून राजकारणात आणले, ज्यांनी १० वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांचा खरा चेहरा तुम्हाला समजण्यास १७ वर्ष लागले मात्र मी १७ दिवसांतच त्यांचा…

संसदेत महिलांसंदर्भात वादग्रस्त विधान

आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले आझम खान यांनी संसदेत देखील महिलांविषयी वादग्रस्त विधान केले. तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरु असताना त्यांनी तात्पुरत्या लोकसभा अध्यक्षा खासदार रमा देवी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. यावेळी त्यांनी एक शेर बोलत म्हटले होते कि, ‘आप मुझे इतनी अच्छी लगती है की मेरा मन करता है, आप की आँखो में आँखे डाले रहूँ’. त्यांच्या या विधानामुळे लोकसभेत मोठा हंगाम झाला होता. त्यांना या प्रकरणी माफी देखील मागण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यांनी अजूनही या प्रकरणी माफी मागितलेली नाही.

दरम्यान, याआधी देखील त्यांना अनधिकृतपणे शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा केल्याप्रकरणी भूमाफिया घोषित करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like