राज्यात अफवा पसरविल्याचे 115 गुन्हे, पोलीस उपमहानिरीक्षक हरीश बैजल यांची माहिती

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन –  राज्यात संचारबंदीत कोरोना संबंधित अफवा पसरविल्याबाबत तबल 115 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य सायबर शाखेकडून अफवा पसरविणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात असून, कोणीही खात्री अफवा न पसरविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक हरीश बैजल यांनी ही माहिती दिली आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर राज्यात संचारबंदी करण्यात आली आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. मात्र या कालावधीत अनेकजण सोशल मीडियावर अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. तसेच काही खोट्या बातम्या तयार करून त्यावर नामांकित मीडियाचा लोगोचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर पोलिसांनी अश्या खोटी माहिती पसरविणाऱ्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. सायबर शाखेकडून अश्यावर नजर ठेवून कारवाई केली जात आहे.

नुकतीच खडकी पोलिसांनी नियंत्रण कक्षाला फोनकरून खोटी माहिती देणाऱ्यास पकडले होते. तर त्यापूर्वी पुण्यात युट्युबवर मटन, चिकन खाल्ल्याने कोरोना होतो असे व्हिडिओ टाकणाऱ्या परराज्यातील दोघांना ताब्यात घेतले होते.
सायबर पोलिसांकडून अश्या प्रकारे अफवा पसरवणारयावर लक्ष ठेवले जात आहे.

राज्यात अश्या प्रकारे अफवा पसरवणाऱ्यावर 115 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, याबाबत उपमहानिरीक्षक बैजल यांनी ट्विटकरून माहिती दिली आहे. तसेच कोणीही बातम्या किंवा खोटी माहिती पसरवू नये असे आवाहन केले आहे.