मुंबई : कळंबोलीजवळ पोलिसांकडून हवेत गोळीबार 

नवी मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन

नवी मुंबई येथील सायना पनवेल महामार्गावर कळंबोलीजवळ मराठा आंदोलन चांगलेच चिघळले आहे . यावेळी महामार्ग रोखल्याने पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. तसेच यावेळी आंदोलकांकडून पोलीस व्हॅनवर तसेच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. दोन गाड्या पेटविण्यात आले असून यावेळी आक्रमक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला .

मराठा क्रांती मोर्चाचा आजचा मुंबईत बंद आहे. वागळे इस्टेट येथे टीएमटी बसची तोडफोड करण्यात आली. मुंबईमध्ये आतापर्यंत बेस्ट बससेवा सुरळीत आहे. नवी मुंबई येथील घणसोलीमध्ये पहाटे दोन बेस्ट बसवर दगडफेक करण्यात आली. दगडफेक झाल्यामुळे ऐरोली ते वाशी पर्यंत बेस्टची बस सेवा बंद आहे. मुंबईतील लोकल सेवा नेहमीप्रमाणे सुरु असली तरी प्रवाशांच्या गर्दीवर परिणाम झाला आहे.
[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f70aa549-8fe6-11e8-b91c-513295c213f6′]

आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोचार्ने बुधवारी मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बंदची हाक दिली आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवांसह शाळा-महाविद्यालये आणि स्कूलबस, दूध- भाजीपाला वगळण्यात आले असून बंददरम्यान कोणतीही हिंसा न करता शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.