नांदेड : गावठी पिस्तुलसह 3 चोरटे गुन्हे शाखेच्या ताब्यात

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – नांदेड शहरात ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत अनेक वेळा चोरट्याने धुमाकूळ घातलेला आपण बातमी पत्रात ऐकत असतो. अनेकांच्या सोबत त्या भागात चोरी झालेली दिसून येत आहे. त्या भागात रात्रीच्या वेळी अनेक लुटारू रस्त्यावर फिरत असतात, ते स्थानिक मूलं असतात अशी चर्चा शहरात सुरू आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला पेट्रोलिंग करीत असताना गोवर्धनघाट पुलाजवळ एका मोटारसायकलवरुन तीन इसम जात असल्याचे दिसले. पोलिसांचे वाहन पाहिल्यानंतर अचानक मोटारसायकलवरुन या दुचाकीस्वारांनी विष्णूपुरीकडे पलायन केले. यामुळे पोलिस पथकाचा संशय वाढला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामराव गाडेकर व इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ ग्रामीण पोलिस ठाण्याला भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करुन मदतीला बोलावले आणि सदर दुचाकी स्वारांचा पाठलाग केला. हे दुचाकीस्वार नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असर्जन चौक ते हस्सापूर रोड वर एका ठिकाणी मोटारसायकल उभी करुन खाली उतरले. त्याचवेळी आणखी सहा लोक त्यांच्या मदतीला आले. पाठोपाठ आलेल्या पोलिस पथकाने रस्त्यावरील विजेच्या खांबाजवळ जीप थांबवून सदर लोकांना हालचाल करु नका, असा आवाज दिला असता पुढील इसम पुढे येवू नका, अन्यथा तुमच्यावर फायर करु, असे ओरडले. मात्र त्याचवेळी सदर चोरट्यांना पोलिसांनी चारही दिशेने घेराव घातला. आरोपीतील एकाने पोलिसांच्या दिशेने पीस्टल रोखले असता पोलिसांनीही स्वसंरक्षणार्थ सर्व्हीस रिव्हॉल्वरमधून चोरट्यांच्या दिशेने दोन राऊंड फायर केले.

यावेळी इंद्रपालसिंग उर्फ सन्नी तिरतसिंघ मेजर (वय २९, रा. चिखलवाडी), हारदीपसिंघ उर्फ सोनू उर्फ पिनीपाना बाजवा (वय ३०, शहीदपुरा), राजूसिंघ नानकसिंघ सरदार (वय ३२, रा. असर्जन), सय्यद सलीम स. रशिद (वय २१, रा. असरफनगर, हिंगोली गेट) आणि नागराज उर्फ लाल्या राजू चव्हाण (वय २७, रा. दत्तनगर) या पाच जणांना ताब्यात घेतले. तर इतर चोरटे अंधाराचा फायदा घेवून पसार झाले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमांकडून देशी बनावटीचे एक पिस्टल, एक जिवंत काडतूस, एक खंजरसह मोटारसायकल जप्त केली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील नाईक यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम ३९९, ४०२, ५०६ भादंवि सह कलम लागल्या आहेत. भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जावेद शेख हे करीत आहेत. पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी येऊन पाहणी केली.

Loading...
You might also like