पोलिसांनी बलात्कारी आरोपीशी लावलं पिडीतेच लग्‍न, पतीला द्यायला लावला ‘तलाक’

ढाका : वृत्तसंस्था – पोलिसांनी एका सामूहिक बलात्कार पीडित महिलेला जबरदस्तीने मुख्य आरोपीशी लग्न करण्यास भाग पडल्याची धक्कादायक घटना बांगलादेशातील पबना पोलिस ठाण्यात घडली आहे. आरोपी हा सत्ताधारी अवामी लीग पक्षाचा अधिकारी आहे. याप्रकरणी  पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि पोलिस सब इन्स्पेक्टर यांना ड्यूटीवरून निलंबित करण्यात आले आहे. सदर पोलिसांनी आरोपींना शिक्षेपासून वाचवण्यासाठी  पीडितेचे  आरोपीशी जबरदस्तीने लग्न लावले असल्याची  माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  बांगलादेशातील सामूहिक बलात्कार पीडितेने न्यायासाठी पोलिस ठाणे गाठले तेव्हा पोलिसांनी तिला बलात्काराच्या आरोपीशी लग्न करण्यास भाग पाडले.

पीडित महिला तीन मुलांची आई असून ती बांग्लादेशच्या पबना जिल्ह्यातील आहे. 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान पाच मुलांनी तिला एका खोलीत नेऊन तिच्यावर वारंवार  बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

बांग्लादेशी वृत्तपत्र डेली स्टारच्या मते पीडितेच्या भावाने सांगितले की पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी त्याच्या बहिणीपासून  घटस्फोटाच्या कागदपत्रांवर जबरदस्तीने सही करून घेतली आणि सामूहिक बलात्काराच्या मुख्य आरोपीशी लग्न करण्यास भाग पाडले.

याविषयी माहिती देताना पबना पोलिस ठाण्याचे प्रमुख मोहम्मद इब्ने मिझान यांनी सांगितले की , ‘ हे लग्न म्हणजे आरोपींना शिक्षेपासून वाचवण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. बलात्कार करणाऱ्या आरोपीला पीडित मुलीशी लग्न करण्यास मदत केल्याबद्दल सब इन्स्पेक्टर एकरामुल हक यांना निलंबित केले आहे. तसेच पबना सदर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनाही ड्यूटीवरून निलंबित करण्यात आले आहे.’

या प्रकरणी चार आरोपींपैकी 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. बलात्काराच्या चारपैकी एक आरोपी हा सत्ताधारी अवामी लीग पक्षाचा अधिकारी आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

Loading...
You might also like