26/11 हल्ल्यात अनेकांचे प्राण वाचवणारे पोलीस निरीक्षक आझम पटेल यांचे ‘कोरोना’मुळे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 26/11 मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि या हल्ल्यात अनेकांचे प्राण वाचवणारे पोलीस निरीक्षक आझम पटेल यांचे कोरोनामुळे आज सकाळी निधन झाले. ते 50 वर्षांचे होते. पटेल हे एसआयडीमध्ये (राज्य गुप्तवार्ता विभाग) कार्यरत होते.

पटेल यांच्यावर सैफी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. त्यांना न्यूमोनिया देखील झाला होता.
2001 च्या बॅचचे पटेल पोलीस अधिकारी होते. त्यांच्या निधनानंतर मुंबई पोलीस दलाला कोरोनामुळे 55 पोलिसांना गमवावं लागलं आहे. तर संपूर्ण राज्यात 108 पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पटेल यांनी 7/11 च्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोटाच्या तपासात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यांनी तपासातून या हल्ल्याचे मोड्यूल उघडकीस आणले होते.

आझम पटेल यांनी दक्षिण मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात सेवा बजावली होती. तसेच दहशतवादी संघटना इसिसची कनेक्शन असल्याच्या संशयावरून कल्याणमधील तरुणांवर कारवाई करण्यात देखील पटेल यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या निधनामुळे मुंबई पोलीस दलाने हुशार अधिकारी गमावला असल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like