चोरीला गेलेल्या गाडीचा पोलिसांनी तीन तासात घेतला शोध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – चोरीला गेलेल्या दुचाकी गाडीचा वाघोली पोलीसांनी शोध घेऊन गाडी मालकाकडे सुपूर्द केली. हा प्रकार रविवारी दुपारी तीनच्या सुमारास वाघेश्वर मंदिराजवळ घडला होता. पोलिसांनी चोरीला गेलल्या गाडीचा तीन तासात शोध घेतला. चोरीला गेलेली गाडी मांजरी खुर्द येथील स्मशाभूमीजवळून ताब्यात घेण्यात आली. याप्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

उल्हास सुरेश महाजन (रा. केसकंद ता. हवेली) हे रविवारी दुपारी तीनच्या सुमारास वाघोली येथील वाघेश्वर मंदिरामध्ये देवदर्शनासाठी गेले होते. त्यांनी त्यांची दुचाकी पार्किंगमध्ये पार्क केली होती. देवदर्शन घेऊन आल्यानंतर त्यांना पार्क केलेली दुचाकी दिसली नाही. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली मात्र काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी वाघोली पोलीस मदत केंद्रामध्ये धाव घेत गाडी चोरीला गेल्याचे पोलीस नाईक शेंडे यांनी सांगितले.

पोलीस नाईक शेंडे यांनी लोणीकंद तपास पथकाला या घटनेची माहिती दिली. तपासी पथकाने वाघोली, मांजरी, शेवाळेवाडी, हडपसर परिसरात कारचा शोध घेतला. दरम्यान पोलीस हवालदार समीर पिलाने यांनी तांत्रीक बाबी पडतळून पाहिल्या असता गाडी मंजरी खुर्द येथील स्मशानभूमिजवळ असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन गाडी ताब्या घेतली. तसेच परिसरात तपास केला मात्र, ही गाडी कोणी आणली याची माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी महाजन यांच्या गाडीचा तीन तासात शोध घेऊन गाडी त्यांच्या ताब्यात दिली.

ही कारवाई लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, समीर पिलाणे, ऋषीकेश व्यवहारे, सुरज वळेकर यांच्या पथकाने केली.

 

आरोग्यविषयक वृत्त –

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

द्रुतगती महामार्गावर भिषण अपघातात तीन ठार, एक गंभीर जखमी

माजी खासदार राजीव सातव यांचे मराठवाडा प्रदेश कार्यकारिणी च्या अध्यक्ष पदी नाव चर्चेत

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ