‘तु नाही भेटलीस तर गळा कापून घेईल’ म्हणणार्‍या पतीनं पत्नीचे दागिने अन् रोकड पळवली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेसबुकच्या (Facebook) माध्यमातून त्याची एका मुलीशी मैत्री केली. त्यानंतर तिच्यासोबत लग्न केलं. मग तिची फसवणूक(Fraud) करून पतीने पळ काढला. असा प्रकार कोलकातामधील एका महिलेसोबत घडला आहे. या महिलेने त्रास सहन करत एक वर्षांनंतर आपल्या फसवणूक केलेल्या पतीच्या घरी पोहोचून एकच गोंधळ घातला आणि उत्तर प्रदेशातील फतेहपूर पोलिसांकडे न्याय मागितला आहे.

या महिलेचे म्हणणे आहे की, “लग्नाआधी पती आत्महत्येची धमकी देत असे. तो म्हणायचा की जर तू लग्नाला होकार दिला नाही, तर मी ब्लेडने गळा कापून आत्महत्या करेन. मात्र, आता तो फसवणूक करून पळून गेला आहे. अशा वाईट लोकांना तुरुंगात पाठवावे, अशी या महिलेची मागणी आहे. लग्नानंतर महिलेचा नवरा घरात ठेवलेल्या सर्व दागिन्यांसह रोख रक्कम लुटून फरार झाला. तसेच, पोलिसांनी लवकरच त्याला अटक केली जाईल, असे आश्वासनही दिले आहे. या महिलेने आपल्या पतीचा शोध घेण्यासाठी कोलकाता पोलिसांसह जिल्ह्यातील पोलिसांकडे संपर्क साधला आहे. यानंतर ही महिला पोलिसांसह पती अभिषेक आर्य याच्या घरी पोहोचली. घराचे कुलूप पाहून महिलेने जोरदार गोंधळ घातला. पीडित महिला दिपाली (नाव बदलले आहे) हिने म्हटले आहे की, अभिषेक आर्याने फेसबुकवर मैत्री केली. ओळखीनंतर कुटुंबातील लांबचे नातेवाईक असल्याचे दिसून आले. काही दिवसांनंतर अभिषेकने लग्नासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली.

याचबरोबर, अभिषेकने गळ्यास ब्लेड लावून आत्महत्या करण्याची धमकी दिली. तू माझ्याशी लग्न केलं नाहीस, तर मी गळा कापून घेईन, असे म्हटले. मात्र त्यानंतर, दिपालीने याकडे दुर्लक्ष केले. पण, अभिषेक दिल्लीहून थेट विमानाने कोलकाताला गेला. कोलकाता येथे पोहोचल्यानंतर अभिषेकने तिला लग्नाची खात्री पटवून दिली. त्यानंतर दोघांचे लग्न झाले आणि हॉटेलमध्येच राहिल्याचे दिपालीने सांगितले. अभिषेकचे वडील राजू आर्य बँक ऑफ बडोदामध्ये काम करतात. ते येथे आल्यावरही गायब झाले आहेत. इतकेच नाही तर अभिषेकने तिच्या घराच्या लॉकरमध्ये ठेवलेले तीन लाखांच्या दागिन्यांसह १ लाख रोख रक्कम घेऊन पळून गेला आहे, असे दिपालीने सांगितले.

दिपालीने तक्रार केली आहे की, फतेहपूरच्या एका मुलाने फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केली. त्यानंतर लग्न केले. यानंतर काही वेळाने मुलगा पैसे आणि दागिने घेऊन फरार झाला. कोलकाता येथे यासंदर्भात खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस स्टेशन कोतवाली आणि सीओ सिटी यांना या प्रकरणाची योग्य ती मदत करण्याचे निर्देश देण्यात आले, जेणेकरून या प्रकरणाची योग्य चौकशी होऊ शकेल. अशा लोकांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे, जेणेकरून ते दुसर्‍या मुलीचे आयुष्य खराब करू शकत नाहीत, असे पीडितेची आईने म्हटले आहे. तर पीडित महिला कोलकाता पोलिसांसोबत आली होती, त्यासाठी कोतवाली पोलीस आणि डीएसपी सिटीला मदतीसाठी सांगितले आहे. लवकरच आरोपीला अटक करुन कोलकाता पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल, असे एसपी सतपाल अंतिल यांनी सांगितले.