गणेश विसर्जन मिरवणुकीत पुण्यातील मंडळांना म्युझीक सिस्टीम लावण्याची परवानगी, मात्र…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सर्वांना आकर्षण असते गणपती विसर्जन मिरवणुकीचे. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भावीक पुण्यात येत असतात. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असतात.

विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलीस आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद्यांवरून वाद निर्माण होत असतात. त्यामुळे पुणे पोलिसांनी गणेश मंडळांना म्युझीक सिस्टीम (स्पिकर) लावण्याची परवानगी दिली आहे. मात्र, डिजे लावण्यास परवानगी नाकारली आहे. म्युझिक सिस्टीमची परवानगी देण्यात आली आहे. मात्र मंडळांकडून ध्वनी प्रदूषण होणार नाही याची हमी घेण्यात येणार आहे.

पुणे पोलिसांनी पुण्यातील गणेश मंडळांना खालील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत

1. मंडळाच्या वतीने वाजविण्यात येणारे साऊंड सिस्टिमधील स्पिकरच्या आवाजाची मर्यादा उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मर्य़ादेपर्यंत राहील.

2. प्रत्येक मंडळाने म्युझिक सिस्टिम (स्पिकर) साऊंड सिस्टिम करीता पोलीस ठाण्यातून त्याबाबतचा स्वतंत्र परवाना घेणे आवश्यक आहे.

3. मिरवणुकीमध्ये डि.जे. किंवा डॉल्बीचा वापर करता येणार नाही.

4. मंडळामध्ये मिरवणुकीच्या वेळी व इतर वेळी वाजविण्यात येणारे म्युझिक सिस्टिम, साऊंड सिस्टिम मधील मिक्सर संचलन करणाऱ्या व्यक्तीने स्थानिक पोलीस स्टेशनला आपली संपूर्ण माहिती (नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि आधारकार्ड) देऊन ओळखपत्र घेणे बंधनकारक आहे.

5. सक्षम प्राधिकरणाने घोषित करण्यात आलेल्या शांतता क्षेत्रामध्ये आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी मंडळांनी घ्यावयाची आहे.

ध्वनीक्षेपकाबाबत मंडळांना देण्यात आलेल्या सुचनांचे तसेच विभागवार देण्यात आलेल्या डेसिबल मीटरचा वापर करून मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपकाच्या भिंती लावून उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –