माजी खा. किरीट सोमय्यांना पोलिसांनी अटक केली, स्वतःच ट्विटरवरून दिली माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – भाजपनेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना त्यांच्या मुलुंड येथील निवासस्थान नीलम नगर येथून अटक करण्यात आली आहे. सोमय्या यांच्या निवास्थानाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. पोलिसांनी सोमय्या यांना घराबाहेर न पडण्याची विनंती केली होती. मात्र, तरी देखील सोमय्या घराबाहरे पडले, त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. किरीट सोमय्या यांना अटक करून मुलुंड पूर्व नवघर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. याबाबत स्वतः किरीट सोमय्या यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

‘जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी मारहाण करण्यात आलेल्या तरुणाला भेटण्यासाठी आपण जात असताना पोलिसांनी मला माझ्या निवास्थानाच्या आवारातून ताब्यात घेत रोखलं. मी सकाळी ११ वाजता त्या तरुणाला भेटणार होतो. असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.’

दरम्यान, किरीट सोमय्या यांना अटक केल्याचा भाजपकडून निषेध करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारला दिल्ली मरकजहुन परतलेल्या तबलिगी जमातीच्या लोकांना शोधायला वेळ नाही. मात्र सामान्य जनतेला मदतकार्य करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना अटक करायला आहे, असं ट्विट महाराष्ट्र भाजपकडून करण्यात आलं.

तर, भाजप आमदार राम कदम यांनी ट्विट करत. ठाण्यामध्ये मारहाण झालेल्या पीडित युवकाला विचारपूस करण्यासाठी निघालेल्या किरीट सोमय्या यांना अटक करणे कितीपट योग्य? ही तर मोगलाई आहे. असें म्हणत सरकारचा निषेध केला.

‘एखाद्या व्यक्तीला मंत्र्याच्या सुरक्षारक्षका कडून, मंत्र्याच्या घरी नेऊन, मंत्र्याच्या उपस्थिती मध्ये मारहाण होत, ही अतिशय गंभीर घटना असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी काल ट्विट द्वारे केली होती.

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like