Pune : 3 वर्षानंतर भामटा पोलिसांच्या ताब्यात ! बोगस पाहुणा बनून अनेकांच्या लग्नात जायचा, अन्..

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाइन –   येथील एका भामट्या व्यक्तीने ३ वर्ष झालं एक वेगळा व्यवसाय हाती घेत अनेकांना लुबाडण्याचे कार्य केले आहे. तर हा यवसाय अर्थातच खोटा पाहूणा होऊन अनेकांच्या लग्न सोहळ्यात जाऊन आहेर गोळा करण्याचे काम करत रोख स्वरूपातील रक्कम तो गडप करायचा. संदीप सगन धोतरे (रा. पिंपळगाव जोगा ता.जुन्नर) असे त्याचे नाव आहे. तर या प्रकारचा उलगडा झाल्याने त्या भामट्या व्यक्तीला (ता.30) मार्च रोजी ओतूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अनेक शहरातील गावामध्ये लग्न समारंभ सुरु असतात, तर याचा गैरफायदा घेत या व्यक्तीने खोटा पाहुणा बनून कपाळी गंध, डोक्यात टोपी, खांद्यावर टॉवेल असा लग्ना सोहळ्यामधील पोशाख करून मंगल कार्यात जाऊन, जाते आहेर दिले जाते. आणि रुखवत मांडला जातो तिथे तो खुर्चीवर असायचा तर जवळ नवीकोरी स्टीलची टाकी, वही-पेन, घेऊन बसायचा. लग्न समारंभाच्या निमित्ताने समोर उपस्थित असलेल्या शहरी पाहुण्यांना पाहुणचारने नमस्कार करायचा. तसेच आहेर स्वीकारले जाती असते सर्वाना सांगायचा, आणि दिलेले रोख स्वरूपातील आहेर गोड बोलून गोळा कार्टर वारीमध्ये नावही लिहायचा. तसेच लग्नातील सर्व कामे आणि पुढंपुढं कामात यायचा आणि शेवटी तो आहेर सर्व गोळा करून पलायन व्हायचा. असे तो दररोज करायचा.

दरम्यान, बुधवारी ३० माार्च ला ओतूरजवळ राज लॉन्स या मंगल कार्यलयात बेनके यांच्या पुतणीच्या विवाहात या खोटाड्या पाहुण्याने ८ हजार ५०० रुपयांच्या आहेराचा गैरवापर केल्या प्रकरणी संदीप धोतरे याच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत लालखन हिवरे येथील रुपाली चंद्रशेखर बेनके यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी या भामट्या व्यक्तीवर पैशाचा गैरवापर केल्याप्रकरणी IPC कलम – ४०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या एका प्रकरणातून अनेक प्रकरणे उघड झाली आहेत. याबाबत पोलिसानी अधिक माहिती घेतली असता या भामट्याने अणे-माळशेज पट्ट्यातील अनेक मंगल कार्यालयातून असे गुन्हे केल्याचे मान्य केले आहे. तर ओतूर पोलीस ठाण्याचे API परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नाईक एन. बी.गोराणे, मुकुंद मोरे, पंकज पारखे यांचे पथकाने संबधीत आरोपीस ता. ३० मार्च रोजी शुभश्री लॉन्स कार्यालयातून अटक केली आहे. याबाबत अधिक तपास पो.नाईक एन. बी. गोराणे हे करत आहेत.