पुणे जिल्ह्यातील नारायणगावमध्ये बनावट प्रवासी पास तयार करून विक्री करणारा गजाआड

नारायणगाव/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूमुळे जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याचा पासची आवश्यक आहे. असेच बनावट पास तयार करून त्याची विक्री करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाने संगणकीय प्रणालीचा वापर करून बनावट आंतरजिल्हा प्रवासी पास तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या फोटोग्राफर तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. लॉकडाऊन कालावधीत त्याने पासची विक्री करत शासनाची तसेच ग्राहकांची फसवणूक केली.

बनावट पास तयार करून त्याची विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी निमगावसावा येथील फोटोग्राफर अनिस महम्मद हनिफ पटेल (वय 24 रा. निमगावावा ता. जुन्नर) याला अटक केली. त्याच्याकडून लॅपटॉप, मॉनिटर, सीपीयू, फ्रिंटर इत्यादी असा एकूण 45 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.

आरोपी पटेल याचा निमगावसावा येथे फोटो स्टुडीओ आहे. फोटो स्टुडिओमधील साहित्याचा गैरवापर करून त्याने शासकीय व पोलीस दलाचे चिन्हांचा बेकायदेशीर वापर करत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊन काळात त्याने अनेक बनावट आंतरजिल्हा प्रवासी पास तयार करून त्याची वाहनचालकांना विक्री करत होता. नाराणगाव पोलिसांनी शनिवारी दुपारी छापा टाकून आरोपीला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून बनावट पास तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. आरोपीला जुन्नर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली असून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.