पुणे : दरोडा टाकणारी टोळी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका फार्म हाऊसमध्ये दरोडा टाकणाऱ्या ८ जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२४) किशोर मुसळे यांच्या फार्म हाऊसवर घडली होती.

मयुर मारुती माकर, सुरज गुलाब ओव्हाळ, अनिकेत दत्ता शेळके, सुरज संतोष गावडे, ऋत्विक गोरख ओव्हाळ, खंडू भानुदास गायकवाड, संदेश शिवाजी जाधव, सागर सुनिल रानवडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1de842f8-ac4d-11e8-9cbc-edab25c9be60′]

किशोर मुसळे यांचे फार्म हाऊसमधील सुरक्षा रक्षक हे रात्रपाळीची ड्युटी करीत असताना अनोळखी ७ ते ८ इसम रूममध्ये घुसले. त्यांनी लाकडी दांडक्याने व हाताने मारहाण करून लोखंडी कोयता व चाकुने सुरक्षा रक्षकास धमकावले. चोरट्यांनी मोबाईल फोन, घडयाळ व रोख रक्क्म असा एकुण अकरा हजार रुपये किंमतीचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने करुन आठ आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली ज्युपीटर मोटार सायकल, तसेच गुन्ह्यात चोरलेला मोबाईल आणि अडीच हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आणि जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पौड पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला असून पुढील तपास पौड पोलीस करीत आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने केली.

जाहिरात