पुण्यातील ढोलताशांवरही पुणे पोलिसांचे ‘कडक’ निर्बंध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील गणेश मंडळांना डीजे किंवा डॉल्बी लावण्यास पुणे पोलिसांनी बंदी घातली आहे. मात्र, स्पिकर लावण्यास परवानगी देताना ध्वनी प्रदुषण होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे. पुणे पोलिसांनी मंडळांना डॉल्बी आणि डिजेवर बंदी घातली असताना आता ढोलताशांवरही पोलिसांनी कडक निर्बंध घातले आहे. पुण्यातील मानाच्या पाच गणपतीच्या पुढे फक्त तीन ढोलताशा पथकांना परवानगी देण्यात आली आहे. तर उर्वरीत गणेश मंडळांना दोन ढोलताशा पथकांना परवानगी देण्यात आली आहे. परवानगी देताना ढोलताशा पथकांना टोल वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

ढोल ताशा पथकांना खालील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.
१.
एका ढोल ताशा पथकामध्ये ४० ढोल, १० ताशे आणि ६ झांज एवढ्याच वाद्यांचा समावेश असला पाहिजे. त्यापेक्षा अधिक वाद्यांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

२. एका ढोल ताशा पथकामध्ये वादक व त्या सभोवतालचे सुरक्षा कडे करणाऱ्या व्यक्ती अशा मिळून जास्तीत जास्त १०० सदस्यांचा समावेश असला पाहिजे. त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समवेश करू नये.

३. पथकात टोल वापरता येणार नाही.

४. गणेश मंडळांसोबत वापरण्यात आलेली ढोल ताशा पथके मिरवणुकीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत तेच राहतील. मिरवणुकी दरम्यान पथके बदलता येणार नाहीत.

५. एका ढोल ताशा पथकाला फक्त एकाच गणेश मंडळासोबत विसर्जन मिरवणुकीत सहभागी होता येईल. सहभागी झालेल्या गणेश मंडळाचे विसर्जन झाल्यानंतर त्या मंडळासोबत असलेल्या ढोल ताशा पथकाला पुन्हा नव्याने दुसऱ्या गणेश मंडळात सहभागी होता येणार नाही.

६. ढोल ताशा पथक मिरवणुक वेळेपुर्वी पोहचले नाही या कारणावरून कोणत्याही गणेश मंडळांना मिरवणुक थांबविता येणार नाही.

७. प्रत्येक ढोल ताशा पथकाने गणेश प्रतिष्ठापना, विसर्जन मिरवणुकीकरीता गणेश मंडळासोबत सहभागी होण्याची व वादन करण्याची स्वतंत्र परवानगी घेणे बंधनकारक आहे. विनापरवाना कोणत्याही ढोल ताशा पथकास मिरवणुकीत सहभागी होता येणार नाही किंवा वादन करता येणार नाही.

८. गणेश प्रतिष्ठापना, विसर्जनाकरीता गणेश मंडळाला ज्या पोलीस अधिकारी यांच्याकडून परवानगी देण्यात आली आहे. अशा मंडळासोबत वादन करण्याकरीता ढोल ताशा पथकांनी त्याच पोलीस अधिकाऱ्याकडून वेगळी परवानी घ्यावी. परवानगी घेताना ढोल ताशा पथकातील सर्व सदस्यांची पूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. इतर पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली परवानगी ग्राह्य धरण्यात येणार नाही.

९. ढोल ताशा पथकातील सदस्यांना पोलीस अधिकाऱ्याची स्वाक्षरी असलेले ओळखपत्र मिरवणुकीच्या सुरवाती पासून ते शेवटपर्यंत जवळ बाळगणे बंधनकारक आहे. ओळखपत्र नसेल तर त्या सदस्याला पथकात सहभागी होता येणार नाही.

१०. ढोल ताशा पथकातील कोणत्याही सदस्याला ढोल किंवा ताशा घेऊन मिरवणुकीच्या उलट दिशेने येता अगर जाता येणार नाही.

११. ढोल ताशा पथकाला ज्या मार्गावर व चौकात संबंधीत अधिकाऱ्याने परवानगी दिली असेल, त्याच मार्गावर व चौकात वादन करता येईल. पथकाला फक्त २० मिनीटेच वादन करता येईल. तसेच ज्या चौकामध्ये किंवा मार्गावर वादन करण्याची परवानगी देण्यात आली आहे, त्या व्यतिरीक्त इतर ठिकाणी वादन करता येणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like