भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसाला बेदम मारहाण

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – दोघांमध्ये सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस कॉन्सटेबलला शिवीगाळ, दमदाटी करत धक्काकबुक्की केल्याचा प्रकार वागळे इस्टेट येथे समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

अशफाक शेख (वय २०, सावरकर नगर ठाणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

तर याप्रकरणी जयेश देसाई या पोलीस कॉन्सटेबलने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख याने टेम्पोचालक संतोष लादे याला कपाळावर मारून जखमी केले होते. हा प्रकार ५ जून रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. त्यावेळी दोघांचे भांडण सोडविण्यासाठी त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्सटेबल देसाई यांनी मध्यस्थी केली. तेव्हा त्यांना त्याने कॉलर पकडून धक्काबुक्की केली. त्यानंतर गणवेशाची बटणेही तुटली.

Loading...
You might also like