Police Hawaldar Suicide | पोलीस हवालदाराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Police Hawaldar Suicide | सांगली शहर पोलीस ठाण्यात (Sangli City Police Station) कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराने आत्महत्या (Police Hawaldar Suicide) केल्याची धक्कादायक घटना (Sangli Crime) समोर आली आहे. रामचंद्र बिरणगे (Ramchandra Biranage) (वय 46, रा. पोलीस लाईन, विश्रामबाग, सांगली) असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून त्या पोलीस हवालदाराने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.

याबाबत माहिती अशी की, मागील आठवड्यामध्ये पोलीस हवालदार रामचंद्र बिरणगे यांच्या घरात चोरी झाली होती. चोरीचा प्रकार झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने सांगलीतील संजयनगर पोलिस ठाण्यात (Sanjay Nagar Police Station) फिर्याद दाखल केली होती. यामध्ये एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला होता.

दरम्यान, हा प्रकार झाल्यानंतर गुरुवारी (7 एप्रिल) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रामचंद्र बिरणगे यांनी घरीच गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली आहे. या दरम्यान, आज (शुक्रवारी) सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलीसांचा (Police) पुढील तपास सुरु आहे.

Web Title : Police Hawaldar Suicide | in-sangli-the-constable-committed-suicide-by-hanging-himself

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ तर, चांदी वधारली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

 

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात उभारले जाणार सौरऊर्जा पार्क

 

Digital-Social Media Training Camp Pune | आगामी निवडणुकीत ‘डिजिटल कार्यकर्त्यां’मुळे मिळेल नवसंजीवनी; रविवारी पुण्यात डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर