5000 ची लाच मागणारा पोलिस हवालदार गोत्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – तक्रारदाराच्या वडिल आणि चुलत्याला वारंटातुन जामिनावर सोडण्याच्या मोबदल्यात 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करणारा पोलिस हवालदार गोत्यात आला आहे. त्यांच्याविरूध्द लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दयाराम देवराम महाजन (वय-47, पोलिस हवालदार बक्‍क नलं. 573, नेमणुक – एमआयडीसी पोलिस स्टेशन, जळगाव, रा. पोलिस हाऊसिंग सोसायटी, सेंटर नं. 12, रूम नं. 5, जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. तक्रारदार यांचे वडिल आणि चुलत्याच्या विरूध्द वारंट आले होते. वारंटातुन जामिनावर सोडण्यासाठी पोलिस हवालदार महाजन यांनी तक्रारदाराकडे 5 हजार रूपायाच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नव्हती म्हणुन एसीबीकडे तक्रार नोंदविली.

एसीबीच्या अधिकार्‍यांनी तक्रारीची पडताळणी केली असता पोलिस हवालदार महाजन यांनी 5 हजार रूपयाची लाच मागितल्याचे निष्पन्‍न झाले. त्यानंतर हवालदार महाजन यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपाधिक्षक जी. एम. ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलेश लोधी यांनी ही कारवाई केली आहे. पोलिस हवालदार महाजन यांच्याविरूध्द जळगावच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्यामुळे पोलिस हवालदार महाजन चांगलेच गोत्यात आले आहेत.