‘त्या’ एका पोलीसाने हलवून सोडले बँक प्रशासन

भोपाळ : वृत्तसंस्था – त्याच्या पगारातून बँकेने ५९ रुपये ट्रांजेक्शन चार्ज म्हणून कापून घेतले. एका पाठोपाठ दोनदा असे पैसे कापून घेतल्याने एका हेड काँस्टेबलने बँकेत जाऊन जाब विचारला. त्याला योग्य उत्तर मिळाले नाही. तेव्हा त्याने ५९ रुपयांसाठी थेट बँकिंग लोकपालाचा दरवाजा ठोठावला आणि बँकेला पैसे परत करण्यास भाग पाडले आहे. आता मध्य प्रदेशातील पोलीस मुख्यालयाला हे सर्व प्रकरण समजल्यावर त्यांनी राज्यातील सर्व पोलीस प्रमुखांना पत्र पाठवून आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पगारातून ट्रांजेक्शन चार्ज म्हणून पैसे कापून घेतले आहे का याची माहिती घेऊन ते त्यांच्या खात्यात परत जमा करण्यासाठी प्रयत्न करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे आता काही कोटी रुपये परत करण्याची वेळ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर येणार आहे. एका हेडकाँस्टेबलने तत्वासाठी दिलेल्या लढ्याने बँक प्रशासन हलवून सोडले आहे.

मध्य प्रदेशातील राज्य सरकारच्या वेतन योजनेद्वारे सूट मिळाली असतानाही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने ट्रांजेक्शन चार्ज म्हणून ५९ रुपयांची कपात केली. त्यावर या हेड काँस्टेबलने लढा दिला व पैसे परत मिळविले.

हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर मध्य प्रदेशातील पोलीस मुख्यालयाने सुद्धा याची चौकशी सुरु केली आहे. कारण राज्यातील इतर ५० हजार पोलीस कर्मचाऱ्यांसोबत अशा प्रकार घडला आहे की नाही, याची खात्री केली जाणार आहे. पोलीस महानिरीक्षकांकडून (वेलफेअर) सर्व पोलीस युनिट्सला पत्र लिहिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बँक खात्याची तपासणी करुन पाहावे की त्यांच्या खात्यातून पैसे कापले आहेत की नाही. ट्रांजेक्शनच्या नावाखाली पैसे कापण्याची तक्रार येत असेल तर युनिट हेडची जबाबदारी आहे की, संबंधित बँकेच्या मॅनेजरशी संपर्क साधून वेतन योजनेचा लाभ पोलीस कर्मचाऱ्यांना देण्याचा आहे, असे पोलीस महानिरीक्षकांनी म्हटले आहे.

दरम्यान, तुम्ही बँकेत जाऊन ५९ रुपये का कापले, असा जाब विचारला असता काय? कोण करणार नाही. कारण मी पण केले नसते. मात्र, एकाच दिवशी असे दुसºयांदा झाले, त्यामुळे याची चौकशी करण्याचा मी निर्णय घेतला, असे या हेड कॉन्स्टेबलने सांगितले. तसेच, या हेड कॉन्स्टेबलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिले आहे.