छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतानिमित्त पोलिसांची केली आरोग्य तपासणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   छत्रपती संभाजी महाराज यांची जयंतीचे औचित्य साधून प्रभाग क्र.26च्या नगरसेविका प्राची आल्हाट व मराठी युवा युथ फाउंडेशनच्या रुपा जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन चिंतामणीनगर येथे केले होते. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी चेक नाक्यावरील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, तसेच विशेष पोलीस अधिकारी, पोलस मित्र यांची आरोग्य तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी वानवडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे सलीम चाउस, संदीप वरपडे, अंकुश डोंबाळे, दत्तात्रय तेलंग, रिपाइं पुणे शहर महिला अध्यक्षा शशिकला वाघमारे, डॉ. रुपाली कारंडे, डॉ. आकांशा गौड, दिलीप कुरणे, युवा उद्योजक आशिष आल्हाट, शिवाजी शेवाळे, विशाल येवले, विकास भुजबळ, मारुती ऊर्फ बाळू मामा भानगिरे, माऊली भानगिरे, उमेश भुजबळ, संतोष राजपूत, महेश सातव, दत्ता घुले, दत्ता घुले, उमेश आल्हाट, शैलेश आल्हाट आधी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, रिपाइंच्या महिला शहराध्यक्षा शशिकला वाघमारे म्हणाल्या की, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी-कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे, यासाठी हा उपक्रम राबविला आहे. नागरिकांनी घरात थांबून प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले.