पोलिसांना हेल्मेट सक्ती, ६ पोलिसांकडून ३ हजार दंड वसूल

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन

दुचाकी चालवताना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. मात्र, पोलीसच हेल्मेट न वापरता दुचाकी चालवतात. त्यांच्यावर कोण कारवाई करणार असा प्रश्न दुचाकीस्वारांकडून विचारला जात आहे. भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी धाडसी निर्णय घेत सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना १ ऑक्टोबर पासून हेल्मेट सक्ती केली आहे. असे असताना देखील हेल्मेटचा वापर न करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर हेल्मेट वापरले नसल्याने कारवाई करण्यात आली. या तिघांकडून तीन हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे. अधीक्षकांच्या या निर्णयाचे सर्वसामान्य जनतेसह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’797d4f63-c662-11e8-b14c-cf04a24711df’]

मोटार वाहन अपघातात सर्वाधिक मृत्यू हेल्मेट नसल्यामुळे होतात. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश शासनाला दिले आहेत. परंतु सामान्य जनतेवर कारवाई करण्यापूर्वी ज्यांच्यावर या कारवाईची जबाबदारी आहे त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. त्यासाठीच जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी १ आॅक्टोबर पासून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोटारसायकल चालविताना हेल्मेट सक्ती केली आहे. या संदर्भात मंगळवारी गृहविभागाचे उपअधीक्षक बी.डी. बनसोडे, वाहतूक पोलीस निरीक्षक गाडे व पथकाने कारवाई केली. सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून तीन हजार रुपये वसुल करण्यात आले. ही कारवाई यापुढेही चालू राहणार आहे.

पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसोबतच इतर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा हेल्मेट न वापरल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आयएसआय दर्जाचे हेल्मेट भंडारा पोलीस मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये बाजारभावापेक्षा स्वस्त दरात उपलब्ध असल्याचे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B01N74LA6J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8075f976-c662-11e8-be05-f331b85fb155′]

जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यातही दुचाकी अपघाताची संख्या सर्वाधिक आहे. हेल्मेट न वापरल्याने डोक्याला इजा होऊन मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करणे गरजेचे आहे. नागरिकांनी दुचाकी घेऊन बाहेर जाताना आयएसआय दर्जाचे हेल्मेट परिधान करूनच प्रवास करावा. असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.

जाहिरात