‘सत्ता’ सर्वांनाच हवी ! पोलीस दल ‘जुंपलं’, उद्यापासून पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्ता स्थापनेवरून सत्ता संघर्ष सुरु असला तरी भाजपने शपथ ग्रहण सोहळ्याची तयारी सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये राज्यातील अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडल्याचे समजतेय. या बैठकीमध्ये राज्यातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असल्याचे समजत असून पुढील आदेश येईपर्यंत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या रजा रद्द कराव्यात असे ठरले असल्याची माहिती समजत आहे.

मुख्यमंत्री पदाचा पेच सुटला नसला तरी भाजपने शपथ ग्रहण समारंभाची तयारी सुरु केली आहे. मुंबई पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या एका पथकाने शुक्रवारी वानखेडे स्टेडीयमची पाहणी केली. नव्या सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांचा शपथ ग्रहण सोहळा या ठिकाणी होणार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी महालक्ष्मी रेसकोर्स या ठिकाणी शपथ ग्रहण सोहळा होणार होता. मात्र, मुंबई पोलिसांच्या अहवालानंतर शपथ ग्रहण सोहळ्याची जागा बदलण्यात आली आहे.

राज्यामध्ये मुख्यमंत्री कोणाचा यावरून भाजप-शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच सुरु आहे. भाजपचा मित्र पक्ष असलेला शिवसेना 50-50 फॉर्म्युल्यावर आडून बसला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री पदाची वाटणी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपने गृह आणि अर्थ या दोन महत्त्वाच्या खात्यांसह इतर महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या