भांडण सोडविण्यास गेलेल्या पोलिस कर्मचार्‍यावर चाकूने सपासप वार

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – चार जणांमध्ये भांडण सुरु असताना तेथे गेलेल्य़ा पोलीस कर्मचाऱ्यावर एकाने चाकूने वार केल्याचा प्रकार धुळे शहरातील आझाद नगर येथे चर्नी रोड जवळ घडला. या घटनेत कर्मचारी जखमी झाला आहे.

सुनील वाघ असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

धुळ्यातील आझाद नगर येथे चर्नी रोड जवळ चार अनोळखी व्यक्ती उभ्या होत्या. त्यावेळी त्यांच्यात काही शाब्दिक चकमक सुरु होती. त्याचवेळी शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सुनिल वाघ हे त्या परिसरात आले. त्या चार अनोळखी व्यक्तींनी वाघ यांना पाहिले व त्यांनी त्यांना काय बघतो रे म्हणत जाब विचारायला सुरवात केली.

वाघ हे त्यांचे जवळ जाणार तेवढ्यातच चौघांतील एकाने जवळ असलेला चाकू काढून त्यांच्या पायावर व पाठीत वार करुन जखमी केले. त्यानंतर ते रक्तबंबाळ झालेले पाहुन घटनास्थळाहून त्यांनी पळ काढला. जखमी पोलीस कर्मचारी यांना नागरीकांच्या मदतीने तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. माजी नगरसेवकाच्या मुलाने हा हल्ला केल्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा