‘त्या’ खून प्रकणात दोन पोलीस निरीक्षकांची (PI) ‘उचलबांगडी’

पुणे (तळेगाव) : पोलीसनामा ऑनलाइन – गहुंजे येथील तरुणाचा खून झाला असताना तळेगाव पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी संगनमत करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हे शाखेने केलेल्या तपास तरुणाचा अपघात नसून खून असल्याचे समोर आले होते. याप्रकरणात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुधीर काटे आणि शिरगाव पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

पत्नीच्या अनैतिक संबंधाबाबत विचारपुस करायला गेलेल्या अक्षय दीपक यादव या तरूणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अक्षयला तळेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात करण्यात आले होते. प्रकृती खालावल्याने त्याला पुण्यातील ससून रुग्णालायात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, याठिकाणी अक्षय याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अक्षय यादव याचा गाडीवरून पडल्याने डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याची नोंद करून पोलीस अधिकाऱ्यांनी खून झाला असताना अकस्मात मयत म्हणून नोंद केली. गुन्हे शाखेने तपास करून तीन महिन्यांतर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात पोलिस अधिकारी, कर्मचारी दोषी असल्याचा संशय आल्याने पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी खातेअंतर्गत चौकशी सुरु केली. यामध्ये पोलिसांचा हलगर्जीपणा आणि दोषी आढळून आले. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुधीर काटे यांची सायबर मध्ये तडकाफडकी बदली करण्यात आली तर नारायण पवार यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तर या प्रकरणात पोलीस उप निरीक्षक वैभव सोनवणे याला निलंबीत करण्यात आले असून इतर कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like