‘त्या’ पोलीस निरीक्षकाला नियंत्रण कक्षाशी केलं ‘संलग्न’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांना तडकाफडकी पुणे नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे. त्यांना कोणत्या कारणामुळे नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, पोलीस आयुक्त व्यंकटेशम यांनी त्यांना नियंत्रण कक्षाला संलग्न करण्याचे आदेश दिले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांना चतुश्रृंगी पोलीस ठाण्याचा कार्य़भार पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्याकडे हस्तांतरीत करण्यास सांगितला आहे. तसेच त्यांना कार्य़भार हस्तांतरीत केल्यानंतर आजच्या आज नियंत्रकक्षात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. तसेच त्यांना नियंत्रण कक्षात हजर झाल्यानंतर अनुपालन अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांना तडकाफडकी नियंत्रकक्षात संलग्न करण्यात आल्याने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कोणत्या कारणामुळे त्यांना तडकाफडकी नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आले हे समजू शकले नाही. तसेच पोलिसांकडे विचारणा केली असता पोलिसांनी देखील यावर भाष्य करण्यास नकार दिला.

आरोग्यविषयक वृत्त –