पोलिस निरीक्षकाचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न; व्हायरल झालेल्या ‘त्या’ मेसेजवरून पोलीस दलात खळबळ

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर येथील पेठवडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांचा एक धक्कादायक मेसेज प्रसारित झाला आहे. तर माझ्यानंतर माझी बायको मुलांना घेऊन आत्महत्या करणार याची मला खात्री आहे. माझी विनंती आहे त्यांना मरू देऊ नका. ग्राऊंड रिपोर्ट घेत जावा अन्यथा माझ्यासारखे कितीतरी अधिकारी आणि कर्मचारी वरिष्ठांच्या स्वार्थीपणात आणि राजकारणात पोलिस खात्याची निष्ठा आणि श्रद्धा हरवून बसतील, असं त्या मेसेजमध्ये उल्लेख आहे. तर हा मेसेज पोळी अधिकाऱ्यांच्या व्हॉटस् अ‍ॅपवर दिसून येत आहे. यावरून पोलीस दलात चर्चेला उधाण आलं आहे.

अधीक माहितीनुसार, पेठवडगाव पोलिस ठाण्यात पीआय प्रदीप काळे हे ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर २०२० असा २६ महिन्यांचा कार्यकाल पूर्ण केला. या कालावधीमध्ये त्यांनी केलेल्या कार्यातील काही त्रुटींमुळे काही वरिष्ठांनी त्यांच्याविरोधात कसुरी अहवाल वरिष्ठांकडे पाठवला होता. यामुळे महापुरादरम्यान कामाची पोच पावती म्हणून सादर केलेल्या पोलिस पदकाचा प्रस्ताव देखील बारगळला गेला होता. या सर्व प्रकरणामुळे प्रदीप काळे हे हताश झाल्याचे त्याच्या मेसेजमधून समजते. या दरम्यान, काळे हे पोलिस ठाण्यात कार्य बजावत असताना राजकीय दबावाखाली काम केल्याचा आरोप त्यांच्यावर झाल्यानेही त्यांना त्रास झाला होता. तर अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्याशी झालेल्या सवांदाबाबत एक ऑडिओ क्लिप निरीक्षक काळे यांनी व्हॉटस् अ‍ॅपवरून सेंड केलीय. मॅडमनी राजकारण आणि वर्चस्व जपण्यासाठीच माझ्या करिअरचा खून केला. आता खोटा डाग लागलेल्या ठिकाणी माझ्या करिअरचे प्रेत घेऊन नोकरी होत नाहीये. असे देखील त्यात नमूद केलं आहे.

प्रदीप काळेंनी केलेल्या मेसेजमध्ये नमूद केलंय की, शेवटी या वडगावची हिम्मत वारणा नदीत सामावतेय. सर्वांना जगण्याची उमेद दिली; मात्र मी मात्र खात्याच्या राजकारणासमोर हरलो. बायकोचा दुपट्टा आणलाय, पायाला दगड बांधायला. ९ मे १९९९ ला लग्न झालं. आज तिच्याच दुपट्ट्याने मरण गाठ बांधतोय. असं भावनिक शब्दात त्यात नमूद केलंय. तसेच या मेसेजवरून एका आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षकांनी म्हटले आमचे सहकारी अधिकारी काळे यांची बातमी वाचून अत्यंत वाईट वाटले. मलाही वरिष्ठांचा अत्यंत वाईट अनुभव आल्याने मी पोलिस महानिरीक्षकांना विनंती करून सातारा जिल्ह्यात बदलीवर काल निघून गेलो आहे. असा मेसेज त्यांनी एका ग्रुपवर पाठवला आहे. काळे यांच्या मेसेजवर अनेक कंमेंट येताना दिसून येत आहे.

दरम्यान, पोलिस खात्यात डिसीप्लीन मेंटेन होण्यासाठी शिक्षा आवश्यक आहे. परंतु, त्या शिक्षेतही फरक केला पाहिजे. जाणूनबुजून स्वतःच्या फायद्यासाठी केलेल्या कसुरीची शिक्षा आणि कामाच्या ओघात अनवधानाने/कामाच्या प्रेशरमध्ये झालेली कसुरी, ज्यामध्ये हेतू नाही त्यालाही कायद्यात कमी शिक्षा आहे. एखाद्या गुन्हेगाराने चांगली वर्तणूक दाखविली तर त्याचीही शिक्षा कमी होते. परंतु; आम्हाला या कैद्याचेही अधिकार नाहीत. असे देखील प्रतिक्रिया येत आहे.