मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Police Inspector Suspended | नो-एन्ट्रीमधून (No-Entry) वाहन चालवल्यामुळे डॉक्टरला मारहाण करून त्यांना चौकशी दरम्यान 3 तास पोलिस ठाण्यात उभं केल्यानंतर कारवाई न करण्यासाठी 25 हजार रूपये (Mumbai Bribe Case) घेतल्याप्रकरणी समता नगर पोलिस स्टेशनमधील (Samta Nagar Police Station) 2 पोलिस अधिकार्यासह एका पोलिस नाईकला अप्पर पोलिस आयुक्त (नॉर्थ रिजन) राजीव जैन (IPS Rajiv Jain) यांनी तडकाफडकी निलंबीत केले आहे. (Police Inspector Suspended)
पोलिस निरीक्षक प्रकाश वसंत पवार (PI Prakash Vasant Pawar), पोलिस उपनिरीक्षक प्रफुल्ल भाऊसाहेब मिसाळ (Prafulla Bhausaheb Masal) आणि पोलिस नाईक सचिन रामराव पाटील (Police Sachin Ramrao Patil) अशी निलंबीत करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात डॉ. सार्थक राठी यांनी तक्रार दिली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. राठी आणि त्यांचे मित्र डॉ. शिरीष राव हे दि. 25 एप्रिल 2023 रोजी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांच्या जाळयात सापडले होते. पोलिसांनी त्यांना कारवाईसाठी समता नगर पोलिस स्टेशनमध्ये नेले (Mumbai Crime News). तेथे त्यांना दुपारी साडे तीन ते सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत उभं राहण्यास सांगण्यात आलं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही डॉक्टरांना पोलिसांनी मारहाण देखील केली. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांच्याकडून 25 हजार रूपये देखील घेण्यात आले. (Police Inspector Suspended)
दरम्यान, डॉ. राठी यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांकडे याबाबत तक्रार दिली.
वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनेच्या चौकशी दरम्यान पोलिस स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेरा तपासला.
त्यावेळी त्यांना 3 तास उभं ठेवण्यात आल्याचं स्पष्ट झालं.
चौकशीमध्ये पोलिस निरीक्षक प्रकाश वसंत पवार, पोलिस उपनिरीक्षक प्रफुल्ल भाऊसाहेब मिसाळ आणि
पोलिस नाईक सचिन रामराव पाटील हे दोषी आढळले.
त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांची विभागीय चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे.
Web Title :- Police Inspector Suspended | 3 Mumbai cops suspended for ‘assaulting, extracting Rs 25,000’ from 2 doctors
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Journalist Amol Kavitkar | भाजपाच्या ‘पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख’पदी अमोल कविटकर