Police Inspector Suspended | पोलिस आयुक्तांची कारवाई ! 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे तडकाफडकी निलंबन तर दोन सहाय्यक आयुक्त कंट्रोल रूमशी संलग्न

ठाणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Police Inspector Suspended |राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहे. तर दुसरीकडे ठाणे शहरातील (Thane Police) भर वस्तीत मात्र खुल्लमखुल्ला डान्स बार (Dance bar) सुरु असल्याची माहिती समोर येताच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या आदेशानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंह (thane police commissioner Jai jeet singh) यांनी कठोर कारवाई केली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील (Thane Police Commissionerate) नौपाडा (Naupada) आणि वर्तकनगर (Vartaknagar) येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर (Senior Inspector) तडकाफडकी निलंबनाची (Police Inspector Suspended) कारवाई केली आहे. तर नौपाडा आणि वर्तकनगर विभागच्या सहाय्याक पोलीस आयुक्तांची (assistant commissioner of police) ठाणे शहर नियंत्रण कक्षात (Thane city control room) बदली (Transfer) केली आहे. या प्रकरणाची चौकशी अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या मार्फेत करण्याचे आदेश दिले आहेत.

गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

ठाणे शहरातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आम्रपाली (Amrapali) आणि अँटीक पॅलेस (Antique Palace) या दोन बारसह वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नटराज (Nataraja) हे तीन डान्सबार सर्रासपणे सुरु असल्याची माहिती समोर आली. तसेच या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे समोर आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस महासंचालकांना (DGP) चौकशीचे आदेश दिले. गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश आल्याने पोलीस महासंचालकांनी लगेच पोलीस आयुक्त जयजित सिंह (thane police commissioner Jai jeet singh) यांना चौकशीचे आदेश दिले.

 

2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित

पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी प्रथमदर्शनी संक्षिप्त चौकशी केली. चौकशीच्या आधारे नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले (senior police inspector Anil Mangle) आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड (senior police inspector Sanjay Gaikwad) यांना सोमवारी सायंकाळी निलंबित केले. तर नौपाडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी (assistant commissioner of police Nita Padvi) आणि वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ (assistant commissioner of police Pankaj Shirsath) यांची कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी ठाणे नियंत्रण कक्षामध्ये बदली केली आहे. दरम्यान ठाणे शहरातील आम्रपाली, अँटीक पॅलेस आणि नटराज या तीन बारचा परवाना निलंबित केला आहे.

पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत नौपाडा आणि वर्तकनगर येथील तीन बार सुरु असल्याचे आढळून आले.
त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांवर निलंबनाची (Senior Police Inspector Suspended) तर दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांना (assistant commissioner of police) नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरुन चौकशी करण्यात येत असल्याचे जयजित सिंह (thane police commissioner Jai jeet singh) यांनी सांगितले.

Web Title : Police Inspector Suspended | Action of Commissioner of Police Jai jeet singh ! Two senior police inspectors were suspended while two assistant commissioners were attached to the control room

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | सोने 47 हजार रुपयांच्या पुढे, तात्काळ करा खरेदी; लवकरच आणखी वाढतील दर

Fact Check | अलर्ट ! नोकरी देण्याच्या बहाण्याने थेट मोदी सरकारच्या नावे होतेय फसवणूक; काळजी घ्या