पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Police Inspector Suspended In Pune | लोकसभा निवडणुकीपासून विविध सणउत्सवाच्या काळात महत्वाचे बंदोबस्त असतानाही ७१ दिवस रुग्ण रजेवर गेलेल्या व त्यानंतर आजतागायत विनापरवाना गैरहजर राहिलेल्या पोलीस निरीक्षकास पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी अखेर निलंबित केले आहे.
पोलीस निरीक्षक अजित पोपटराव गावित (PI Ajit Popatrao Gavit) असे निलंबित केलेल्याचे नाव आहे. अजित गावित यांची पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत झोपडपट्टीचे प्रमाण जास्त असून अतिसंवेदनशील भाग आहे. धुलीवंदन, रंगपंचमी, शिवजयंती, रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, हनुमान जयंती, लोकसभा निवडणुक २०२४ अशा अत्यंत महत्वाचे बंदोबस्तास हजर राहणे अत्यंत आवश्यक असताना अजित गावित हे रुग्णता रजेवर गेलेले होते. १८ मार्च ते २७ मे २०२४ पर्यंत असे एकूण ७१ दिवस रजेवर गेले होते. त्यानंतर २८ मे २०२४ रोजी एक दिवस ते कर्तव्यावर हजर झाले. त्यानंतर २९ मे २०२४ पासून आजतागायत विनापरवाना गैरहजर राहिलेले आहेत. त्यामुळे अजित गावित यांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले आहे.