Police Inspector Suspended | पोलिस आयुक्तांचा रूद्रावतार ! पोलीस निरीक्षक तडकाफडकी निलंबित; जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Police Inspector Suspended | गणेशोत्सवात अनेकजण आपल्या गावी जात असतात. मात्र, नोकरीच्या निमित्ताने बाहेर गावी असल्याने आणि सुट्टी मिळत नसल्याने गावी जाता येत नाही. गणेशोत्सवात गावी जाता यावे यासाठी अनेकजण आजारी असल्याचे कारण देऊन गावी निघून जातात. मात्र, आजारपणाचे कारण सांगून गावी जाणं पोलीस निरीक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. खोटे सांगून गावी गेलेल्या राखीव पोलीस निरीक्षकाला पोलीस आयुक्तांनी निलंबित केले आहे. (Police Inspector Suspended)

आजारी असल्याचे खोटे सांगून गावी गेलेल्या राखीव पोलीस निरीक्षकाला तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश लोहमार्ग पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे (IPS Ravindra Shisve) यांनी काढले आहेत. घाटकोपर मुख्यालयात असलेल्या राखीव पोलीस निरीक्षक संजय सावंत (Police Inspector Sanjay Sawant) यांनी गणपतीला गावी कणकवलीला (Kankavali) जाण्यासाठी रजा मागितली होती. (Police Inspector Suspended)

मात्र, गणेशोत्सव सुरु असल्याने संवेदनशील बंदोबस्त असल्याने साप्ताहिक सुट्टी वगळता इतर सर्व रजा रद्द करण्यात आल्या आहेत. 14 तारखेला राखीव पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी आजारी असल्याचं करण देत सुट्टी घेतली. मात्र त्यांच्या आजारपणाबद्दल शंका आल्याने खात्री करण्यासाठी ठाकुर्ली येथील घरी पोलीस कर्मचारी पाठवून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या मुलाने ते गावी कणकवलीला गेल्याचे सांगितले.

Police Inspector Suspended

राज्यभरात गणेशोत्सव सुरु असल्याने महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना साप्ताहीक
सुट्टी वगळता इतर सर्व रजा रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये गणपती दर्शन आणि
देखावे पाहण्यासाठी राज्यभरातून गणेश भक्त येत असता. त्यामुळे कोणताही अनुचित घटना घडू नये यासाठी
पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येत असतो. मात्र, राखीव पोलीस निरीक्षक संजय सावंत हे आजारपणाचे
खोटे कारण सांगून गावी गेल्याचे समजताच पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Youth Dead Body Near Khambatki Tunnel | पुण्यातील तरुणाचा मृतदेह आढळला खंबाटकी बोगद्याजवळ, पाच दिवसांपासून होता बेपत्ता; प्रचंड खळबळ

Pune RTO- Helmet Compulsory | पुण्यात हेल्मेट सक्ती? कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट बंधनकारक, पुण्यातील तब्बल 1744 कंपन्यांना नोटीसा

Maharashtra Police News | कर्तव्यावर असलेल्या पोलिसानं स्वत:वरच झाडली गोळी, पोलिस दलात प्रचंड खळबळ