अवैध धंदे चालु करण्यासाठी पोलीस निरीक्षकला ‘प्रलोभन’, हवालदाराविरुद्ध गुन्हा

बोईसर : पोलीसनामा ऑनलाइन – बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदाराने चक्क पोलीस निरीक्षकाला प्रलोभन दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.११) सायंकाळी सातच्या सुमारास बोईसर पोलीस ठाण्यात घडला.

याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन सुभान परबकर (वय-५०) यांनी बोईसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार रमेश नौकुडकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनार्दन परबकर हे बोईसर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्य़रत आहेत. तर रमेश नौकुडकर हे स्थानिक गुन्हे शाखेत हवालदार म्हणून कार्यरत आहेत. जनार्दन परबकर यांनी बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करू नये तसेच अवैध धंद्ये बंद करू नयेत यासाठी रमेश यांनी परबकर यांची बोईसर पोलीस ठाण्यात भेट घेतली.

यावेळी रमेश यांनी अवैध धंदे बंद न करण्यासाठी आणि कारवाई न करण्यासाठी परबकर यांना प्रलोभन दाखवले. पोलीस निरीक्षकांनी याला नकार दिला असता हवालदार रमेश नौकुडकर याने जादा प्रलोभन देऊ केले. मात्र या प्रलोभनांना बळी न पडता पोलीस निरीक्षकांनी याला नकार दिला.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी बेकायदेशीर प्रलोभन दाखवल्या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यांच्या फिर्यादेवरून पोलीस हवालदार रमेश नौकुडकर याच्यावर भष्ट्राचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी हे करीत आहेत.

सिने जगत –

चाहत्यांच्या ‘निगेटीव्ह ट्रेंड्स’ नंतर ‘खिलाडी’ अक्षय कुमारचे चाहत्यांना ‘हे’ आवाहन

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य