Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलातील ‘त्या’ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Police Inspector Transfer | बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण (Police Inspector Mahesh Dhawan) यांची पोलीस मुख्यालयात (Headquarters) तडकाफडकी बदली (Police Inspector Transfer) करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक ढवाण यांच्या बदलीचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) यांनी दिले आहेत.

पोलीस निरीक्षक महेश ढवाण हे 24 सप्टेंबरपासून अर्जित रजेवर आहेत. तेव्हापासुन त्यांचा पदभार पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे (Police Inspector Prabhakar More) यांच्याकडे सोपवण्यात आला होता. सध्या ढवाण यांच्या बदलीनंतर तालुका पोलीस ठाण्याचा (Taluka Police Station) तात्पुरता पदभार आता पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत राहणार आहे. पोलीस निरीक्षक मोरे हे पुणे ग्रामीण डायल 112 चे पोलीस निरीक्षक आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, 4 ऑक्टोबरला जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक झाली.
त्यात ढवाण यांची नियंत्रण कक्षात बदली (Police Inspector Transfer) करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ढवाण यांनी बदली झालेल्या ठिकाणी त्वरीत हजर होवून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
महेश ढवाण यांच्याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली होती.
त्याची गांभीर्याने दखल घेत त्यांची तडकाफडकी बदली झाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.

Web Title :- Police Inspector Transfer | police inspector mahesh dhawan has been transferred to police headquarters

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Water Supply | पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

Devendra Fadnavis | वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस निरूत्तर, महत्वाचा प्रश्न असूनही म्हणाले – ‘दररोज तीच कॅसेट वाजवताय’, जरा…