पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) दलातील दोन पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या (Police Inspector Transfer) करण्यात आल्या आहेत. बारामती शहर पोलीस ठाण्याचे (Baramati City Police Station) पोलीस निरीक्षक नामदेव गणपतराव शिंदे (Namdev Ganapatrao Shinde) यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तर जेजुरी पोलीस ठाण्याचे (Jejuri Police Station) पोलीस निरीक्षक सुनिल दशरथ महाडिक (Sunil Dashrath Mahadik) यांची बारामती शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस आस्थापना मंडळ पुणे ग्रामीणचे अध्यक्ष तथा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) यांनी काढले आहेत.
प्रशासकीय (Administrative) कारणास्तव ही बदली (Police Transfer) करण्यात आल्याचे कारण नमूद करण्यात आले. मात्र या तडकाफडकी बदलीमागे काही वेगळी कारणे असल्याची चर्चा बारामती शहरात आहे. मागील काही दिवसांपूर्वी एका गंभीर स्वरुपाच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नामदेव शिंदे याची बदली (Police Inspector Transfer) झाल्याची चर्चा आहे.
–
नामदेव शिंदे यांची नियंत्रण कक्षात (control room) तडकाफडकी बदली करण्यात आली असून
त्यांच्या जागी जेजुरीचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांना तातडीने कर्यभार स्विकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बुधवारी (दि.27) रात्री उशीरा बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.
Web Title :- Police Inspector Transfer | two police inspector transfer in pune rural police Namdev Ganapatrao Shinde and unil Dashrath Mahadik
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update