#Video : हेल्मेट न घालणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची मुजोरी, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : वृत्तसंस्था –  दुचाकी चालकांनी हेल्मेट घालणे सक्तीचे असल्याचा नियम आहे. मात्र हा नियम फक्त सामान्य नागरिकांनाच लागू आहे का असा प्रश्न सध्या पडला आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हयरल होत आहे. यामध्ये  अधिकारी दुचाकीवरून जाताना दिसत आहेत. तसेच त्याने हेल्मेट घातलेले नाही. त्या पोलीस अधिकाऱ्याला या विषयी विचारणा केली असता त्याने उर्मट भाषेत उत्तरे देत मी पोलीस आहे हेल्मेट विषयी तू विचारणारा कोण अशी उत्तरे दिल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
सध्या सोशल मीडियीवर व्हायरल होणारा व्हिडीओ हा मुंबई पोलीस दलातील एका पोलीस अधिकाऱ्याचा आहे. हा पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किंवा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असावा. या पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ एका दुचाकीस्वाराने चित्रीत केला आहे.

या दुचाकीस्वाराने पोलीस अधिकाऱ्याचा पाठलाग करून त्यांना याविषयी जाब विचारला असता त्या पोलीस अधिकाऱ्याने आपण पोलीस असल्याचा रुबाब दाखवत दुचाकीस्वारावर मुजोरी केली. थोडक्यात पोलीस अधिकाऱ्याने दादागिरी केली. त्यामुळे जगाला शिकवायचे ज्ञान आणि स्वत: कोरडा पाषाण असे चित्र सध्या पोलीस दलात दिसत आहे.

ट्रिपल शिट, हेल्मेट न घालणे किंवा सिग्नल तोडणे यावर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उचलला जातो. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक पोलीस अधिकारी सिग्नल तोडून पुढे जातो. त्यावेळी पाठिमागून येणारा दुचाकीस्वार या पोलीस अधिकाऱ्याला हेल्मेट विषयी विचारणा करतो. त्यावेळी या पोलीस महाशयांचा पारा चढतो आणि ते दुचाकीस्वाराला निघून जाण्यास सांगतात.

ज्यावेळी दुचाकीस्वार हेल्मेट न घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला झापतो त्यावेळी पोलीस अधिकारी अरेरावीची भाषा करत असल्याचे दिसून येत आहे. मी पोलीस अधिकारी आहे… मी सिग्नल तोडणार… कुणाला तरी उडवणार तू मला जाब विचारणार कोण अशा पद्धतीची उत्तरे तो अधिकारी देत आहे. जर कायद्याचे रक्षकच जर नियम पाळत नसतील तर त्यांनी इतरांवर कायद्यानुसार कारवाई करण्याचा यांना काय अधिकार आहे. असा प्रश्न सध्या मुंबईकरांना पडला आहे. ज्या प्रमाणे मुंबईत सुरू आहे तसेच पुण्यातही सुरू आहे.

एक वेळ व्हीआयपी बंदोबस्त असेल किंवा एखाद्या आरोपीचा पाठलाग सुरु असेल तर समजू शकतो. मात्र व्हायरल व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी सिग्नल तर तोडतोच शिवाय फोनवर बोलताना दिसत आहे. या मुजोर पोलीस अधिकाऱ्यावर मुंबई पोलीस काय कारवाई करते हे पाहणे योग्य ठरेल. या अधिकाऱ्यावर कारवाई होणार नाही. कारण हे सगळे एकाच माळेचे मणी असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.