मौजमजा करण्यासाठी घातला दरोडा, ५ जणांना अटक

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – शेतातील पिकांच्या राखणीसाठी थांबलेल्या शेतगड्याचा खून करुन मृतदेह विहिरीत फेकून दिला होता. त्यानंतर जवळच्या एका मंदिरात दरोडा टाकल्याची घटना शुक्रवारी (दि.१) सकाळी उघडकीस आली होती. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने पाच जणांना अटक केली असून मौजमजा करण्यासाठी दरोडा टाकल्याचे आरोपींनी कबुल केले. खूनाचा प्रकार आसोदा शिवारातील शेतात घडला होता. यामध्ये दौलत काळे या शेतगड्याचा खून करण्यात आला होता.

आलेल्या कैलास बारेला, अमरसिंग बारेला, सागर पावरा, विक्रम बारेला व एक अल्पवयीन अशा पाच दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली. भोंगऱ्या बाजार या सणाला गावी जाऊन मौजमजा करण्यासाठी दरोडा टाकल्याची कबुली पाच जणांनी दिली आहे. तांब्याची तार विकण्यासाठी भंगार दुकानात आले असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दरोडेखोरांना अटक केली. ही तांब्याची तार एका मंदिरातून चोरीली होती. तसेच मंदिरातून दानपेटी आणि घंटा देखील त्यांनी चोरली होती.

दरोडेखोरांनी गुरुवारी रात्री गेंदालाल मिल भागातील एका दारुच्या दुकानात मद्यप्राशन केले. यानंतर नशेतच त्यांची आसोदा रेल्वेगेट ओलांडून शेतामध्ये प्रवेश केला. काळे पिकांची राखण करीत असलेल्या शेतातही त्यांनी मद्यपान केले. यानंतर काळेंना मारहाण केली. यामध्ये काळे यांचा मृत्यू झाल्याने त्यांचा मृतदेह दोरीने बांधून विहिरीत फेकून दिला.

काळे यांचा खून करुन दरोडेखोरांनी म्हाळसा देवी मंदिराच्या मागे असलेले सुरेश बारेला यांना धमकावून तांब्याती तार चोरून नेली. ही तार विकण्यासाठी दरोडेखोर जळगाव किंवा भुसावळ शहरात भंगार दुकानावर जातील असा संशय पोलिसांना आला होता. त्यानुसार पोलिसांनी अनेक ठिकाणी सापळे रचले होते. पोलिसांना आलेल्या संशयानुसार दरोडेखोरांनी ही तार विकण्यासाठी शुक्रवारी दुपारीच प्रयत्न केला. एका दरोडेखोराने गेंदालाल मिल भागातील भंगारच्या दुकानावर तार नेली होती. याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या ठिकाणी सापळा रचून पाचही दरोडेखोरांना ताब्यात घेतले.