चाकण दंगल प्रकरणात माजी आमदार दिलीप मोहीतेंना केव्हाही होऊ शकते अटक ?

चाकण : पोलीसनामा ऑनलाईन – चाकण दंगल प्रकरणात खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण दंगल प्रकरणाचा तपास सध्या एसआयटी करत असून पोलीस आज मोहिते यांच्या घरी गेले होते, मात्र ते घरामध्ये नसल्याने त्यांना अटक करता आली नाही.

चाकण येथे झालेल्या मराठा आंदोलन प्रकरणात दिलीप मोहिते यांचे नाव दाखल झाल्यानंतर आज दिवसभर त्यांच्या अटकेची चर्चा होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खेड आणि चाकणमध्ये मोठा बंदोबस्त तैनात केला होता. दिलीप मोहिते यांच्या अटकेवरून खेड तालुक्यातील राजकीय वातावरण तीव्र होण्याची शक्यता आहे.

चाकण दंगल प्रकणात माजी आमदार दिलीप मोहितेंचे नाव निष्पन्न झाले आहे. त्यांच्या नावाची नोंद चाकण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. आज पोलीस त्यांच्या घरी गेले होते. मात्र, ते घरी सापडले नाहीत. पोलीस त्यांच्या मागावर असल्याचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या