विनाअनुदानित ‘शिक्षकां’वर पोलिसांकडून ‘लाठीचार्ज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – समान कामाला समान वेतन या मागणीसाठी मुंबई च्या आझाद मैदानात जमलेल्या विनाअनुदानित शाळामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांवर पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज झाल्याचा प्रकार घडला. यात 10 ते 15 शिक्षक जखमी झाले. या लाठीचार्जमुळे आझाद मैदान परिसरात तणावात्मक वातावरण आहे.

सरकार विरोधात घोषणाबाजी –
इतर शिक्षकांप्रमाणे विनाअनुदानित शिक्षकांना देखील समान कामास समान वेतन द्यावे. तसेच शंभर टक्के अनुदान द्यावे. अशी मागणी घेऊन सोमवारी दुपारी अनेक शिक्षक मैदानात उतरले. यावेळी मोर्चकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या गोंधळात पोलिसांनी शिक्षकांवर अमानुष लाठीचार्ज केला. यामुळे परिस्थिती आणखीच चिघळली.

तोडगा न काढल्यास आंदोलन कायम –
आंदोलन चिघळल्याची माहिती मिळताच पोलिस उपायुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली. शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी या प्रकारची माहिती घेतली. त्यांनी मोर्चेकऱ्यांच्या पाच जणांच्या शिष्ठ मंडळाला भेटायला येण्याची विनंती केली. परंतू मोर्चेकऱ्यांनी त्याला विरोध केला आणि मंत्र्यांना आझाद मैदानात भेटण्यास बोलवावे अशी मागणी केली. पोलिसांच्या शिष्टाईमुळे अखेर पाच जणांचे शिष्टमंडळ शिक्षण मंत्र्यांना भेटायला गेले.

मोर्चेकरी शिक्षकांनी इशारा दिला आहे की, कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न मांडून त्यावर तातडीने तोडगा काढण्यात यावा, तो पर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही.

या मागण्यासाठी आंदोलन –
1. मराठी माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये 19 वर्षांपासून अनुदान सुरु झालेले नाही, ते अनुदान सुरु करावे.
2. ज्या शाळांना 20% अनुदान देण्यात येते. त्यांना नियमांनुसार 100% अनुदान देण्यात यावे.
3. कर्तव्यात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे.

आरोग्यविषयक वृत्त –