पुण्यात मध्यरात्री भारताचा विजय साजरा करणाऱ्या ‘क्रिकेटप्रेमीं’वर पोलिसांचा ‘लाठीचार्ज’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारताचा विजय साजरा करण्यासाठी फर्ग्युसन रोडवर मोठ्या प्रमाणावर जल्लोष करणाऱ्या तरुणाईवर पोलिसांनी जोरदार लाठीमार केल्याची घटना मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास डेक्कन जिमखाना परिसरात घडली. गाड्यांवर, बसवर उभे राहून तिरंगा हातात घेऊन नाचत घोषणा देणाऱ्या असंख्य तरुण, तरुणीला पोलिसांनी लाठीमार करुन झोडपून काढले. त्यात अनेक जण किरकोळ जखमी झाले आहे.

भारताने पाकिस्तानवर विजय मिळविल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी फर्ग्युसन रोडवर मोठ्या संख्येने तरुणाई जमली होती. दुचाकी, चारचाकी, जीपवर चढून हवेत तिरंगा फडकावित ते जल्लोष करीत होते. त्यामुळे संपूर्ण रस्ता अडविला गेला होता. मोठमोठ्या आवाजात स्पिकर लावून संभाजी महाराजांचा पुतळ्यापासून पेट्रोल पंपापर्यंत तरुण गाड्यांवर चढून नाचत होते. काही तरुण तिरंगा झेंडा घेऊन बसवर चढून नाचत होते. त्यामुळे संपूर्ण फर्ग्युसन रोड पूर्णपणे जाम झाला होता.

हे पाहिल्यावर मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गुडलक चौकातून काही कमांडो हातात काठ्या घेऊन धावत आले. त्यांच्याबरोबर स्थानिक पोलिसांनीही पुढे मागे न पाहता समोर दिसेल, त्यांच्यावर लाठीमार करण्यास सुरुवात केली. त्यांच्या लाठीच्या तडाख्यात काही लहान मुलेही सापडली. काही जण कडेला उभे राहून या तरुणांचा व्हिडिओ काढत होते. त्यांनाही पोलिसांनी सोडले नाही. पोलिसांच्या या लाठीमारामुळे जिकडे वाट मिळेल, तिकडे लोक पळू लागले. त्यात रस्त्याच्या कडेला लावलेल्या अनेक गाड्या पडल्या. पळताना पडल्याने अनेक जण किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी लाठीमार करुन काही मिनिटात रोड मोकळा केला.

आरोग्यविषयक वृत्त –

लठ्ठपणामुळे लहान मुलही होऊ शकतात उच्च रक्तदाबाचे ‘बळी’

गर्भवती महिलांना हे संकेत मिळाले तर त्यांची प्रसूती कधीही होऊ शकते.

रक्तदानामुळे शारीरीक आणि मानसिक आरोग्य राहते चांगले

हे पदार्थ खा राहाल कायम ‘हेल्दी’