पोलिस दलात डर्टी पिक्चर ! ‘त्या’ 29 वर्षीय काॅन्स्टेबलनं रेकाॅर्ड केला महिला पोलीसाचा बाथरुमध्ये कपडे बदलताना व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस दलात काळीमा फासणारी घटना आज वांद्रे येथे घडली आहे. एक पोलीस काॅन्स्टेबलनं आपल्या सहकारी महिला पोलीसाचे प्रसाधनगृहात कपडे बदलतानाचा व्हिडीओ रेकाॅर्डींग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अनिकेत परब वय वर्षे 29 असे पोलीस काॅन्स्टेबलचे नाव असून त्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. अटक केल्यानंतर अनिकेतचे तात्काळ निलंबन करण्यात आले आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, वांद्रे येथील हिल रोडवरील सरकारी बॅंकेमध्ये अनिकेतला सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. त्याच बॅंकेमध्ये तक्रारदार महिलेला मागील तीन दिवसापुर्वी तैनात करण्यात आले होते. बुधवारी पावणे पाचच्या सुमारास तक्रारदार महिला पोलीस कपडे बदलण्यासाठी रेस्ट रुममध्ये गेली त्यावेळी तेथे अनिकेत होता. महिला पोलीसाने त्यास बाहेर जाण्यास सांगितले. अनिकेत बाहेर गेला मात्र त्याने रेकाॅर्डींग करण्यासाठी आपला मोबाईल तेथेच चालू करुन ठेवला. महिला पोलीसाला अनिकेतने रुमालाखाली लपवून ठेवलेला दिसला. दरम्यान तिने मोबाईल बघीतला तेव्हा मोबाईल मध्ये व्हिडीओ रेकाॅर्डींग चालू होती. तो मोबाईल घेवून ती महिला पोलीस आरोपी अनिकेतकडे गेली व त्याला या कृत्याचा जाब विचारला. तेव्हा त्याने मोबाईल हिसाकाऊन घेतला व माझ्या मोबाईलला तू हात लावण्याची हिम्मत कसी केलीस ? असा उलट प्रश्न विचारला. नंतर आरोपी तेथून पळून गेला व परत येऊन महिला पोलीसास आपण काहिही रेकाॅर्डींग केली नाही असा दावा केला.

मात्र आरोपीने व्हिडीओ क्लिप डिलीट केल्याचा संशय असल्याचे त्या महिला पोलीसाने वरिष्ठांना सांगितले. दरम्यान पोलीस उपायुक्तांनी बॅंकेत येऊन या प्रकरणाची शहानिशा केली व महिला पोलीसास एफआयआर नोंदवण्यास सांगितले. पुढील तपास वांद्रे पोलिस करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –