पोलिस ठाण्यात तक्रारदार महिलेसमोर कर्मचार्‍यानं केलं चक्क ‘हस्तमैथून’, व्हिडीओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – उत्तरप्रदेशमधील देवरीया येथे एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला आलेल्या महिलेसमोर पोलिसाने हस्तमैथुन केल्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे. महिलेने घडलेला हा प्रकार तिच्या मोबाईलमध्ये शूट केला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे. भीष्म पाल सिंग असं त्या पोलिसाचे नाव असून त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच त्याला निलंबित सुद्धा करण्यात आलं आहे.

सदर महिला तिच्या मुलीसोबत जागेच्या भांडणातून चार वेळा पोलीस स्टेशनमध्ये आली होती. पहिल्या वेळेस जेव्हा त्या आल्या होत्या तेव्हा भीष्म पाल सिंग हे तिची तक्रार नोंद करून घेत असताना तिच्याकडे एकटक पाहत हस्थमैथुन करत होते. तेव्हा महिलेला व तिच्या मुलीला त्याचा किळस वाटला. प्रत्येक वेळी ती पोलीस स्टेशनमध्ये आली तेव्हा भीष्म पाल सिंग असेल वागले. त्यामुळे चौथ्या वेळी या महिलेच्या मुलीने व्हिडीओ काढायचे ठरवले. या प्रमाणे तिने व्हिडीओ काढून सोशल मीडियावरती व्हायरल केला. त्यानंतर या महिलेने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली.

दरम्यान, यासंदर्भात बोलताना महिला म्हणाली, ‘सुरुवातीस दोन-तीन वेळा त्याच्याकडे मी दुर्लक्ष केले पण त्याचे हे प्रकार वाढतच होते. त्याच काळात आणखी एका महिलेने असाच प्रकार तिच्या सोबत देखील घडल्याच सांगितलं. म्हणून मी हा प्रकार उघडकीस आणायचे ठरवले.