पोलीसांनी धक्काबक्की करून गचांडी धरत आेढत नेलं : अजित नवले

सोलापूर : पोलीसनामा आॅनलाईन

सांगलीहून सोलापूरला आलेल्या अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते अजित नवले यांनी, पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. एवढंच नाही तर नवलेंचं असं म्हणणं आहे की, पोलीस निरीक्षक नरसिंह अंकुशकर यांनी गचांडी धरत त्यांना आेढत नेलं. नवले यांच्या नेतृत्वात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन होणार होते. आज आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी  कार्यकर्ते सहकार मंत्र्यांच्या घरासमोर जात असताना हा प्रकार घडला आहे. आजच आंदोलनाचा शेवटचा दिवस होता.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’395f4681-c972-11e8-af43-e9333215da7c’]

सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गासाठी अधिग्रहित झालेल्या जमिनीचा मोबदला २०१३ च्या परिपत्रकाप्रमाणे तातडीने मिळावा अशा मागणीसाठी अजित नवले आणि इतर कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन करण्यात आले होते. सर्व आंदोलक सहकार मंत्र्यांच्या घराकडे जात असताना होटगी रोडवर पोलीसांकडून या आंदोलकांच्या गाड्या रोखण्यात आल्या. याचवेळी पोलीसांनी धक्काबुक्कीचा केल्याचा आरोप अजित नवले यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड | भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे पद रद्द

आज आंदोलनाचा शेवटचा दिवस होता आणि सर्व आंदोलक सहकार मंत्र्यांच्या घरोसमोर जात होते त्याचवेळी पोलीसांनी सर्व कार्यकर्त्यांच्या गाड्या रोखल्या. त्यानंतर सर्व कार्यकर्ते गाड्या सोडून पायी पुढे निघाले. जवळजवळ दीड हजार कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. ‘आम्ही सहकार मंत्र्यांच्या घराकडे जाताना पोलीसांनी मला धक्काबुक्की केली’ असे नवले यांचे म्हणणे आहे. ‘माझी गचांडी धरून मला गाडीत टाकलं’ असा आरोपही त्यांनी केला. पोलीसांनी केलेल्या अशा दडपशाहीमुळे सभेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आंदोलकांनी रस्त्यावरच आपला ठिय्या मांडला आणि पोलीसांविरुद्ध घोषणाबाजीला सुरुवात केली.

[amazon_link asins=’B07CBJS9X6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4eeadedb-c972-11e8-8e6e-fd0f44db908a’]