अरे बापरे ! चक्क पुणे आयक्तालयासमोरून पोलिसाचीच दुचाकी चोरीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील गणेश मंडळ, क्लब यांना परिसरात सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन पुणे पोलीस करत आहेत. मात्र, दुसऱ्यांना आवाहन करणाऱ्या पुणे पोलिसांच्या आयुक्तालाच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही नसल्याचे समोर आले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाबाहेर पार्क केलेली पोलिसाची गाडी चोरट्यांनी चोरून नेली. या मुळे चोरट्यांमध्ये पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे दिसून येतेय.

पुणे शहरात दररोज अनेक वाहने चोरीला जात आहेत. चोरट्यांकडून महागडी वाहने टार्गेट केले जात आहेत. नागरिकांनी वाहन पार्क करताना योग्य ठिकाणी पार्क करावी. उजेडात गाडी पार्क करावी अशा सुचना पुणे पोलिसांनी नागरिकांना दिल्या आहेत. नागरिकांना परिसरात सीसीटीव्ही लावण्याबाबत पोलीस आग्रह करत असताना आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे संपूर्ण शहरात व्यापारी, गणेश मंडळांना सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे पोलीस आयुक्तालया बाहेर वाहतूक शाखेत कार्य़रत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने गाडी पार्क केली होती. चोरट्यांनी पोलीस कर्मचाऱ्याची गाडी आयुक्तालयासमोरून चोरून नेली. याप्रकरणी समीर चव्हाण (रा. गोखलेनगर, पोलीस वसाहत) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चव्हाण हे वाहतूक शाखेत कार्य़रत असून ते कामानिमित्त आयुक्तालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी आपली दुचाकी आयुक्तालयाच्या गेट क्रमांक ३ बाहेर पार्क केली होती. दोन दिवस गाडीचा शोध घेतला मात्र गाडी सापडली नसल्याने त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त