गुंतवणूकदारांना ५५ लाखांचा गंडा घालणाऱ्या मातृभूमी फायनान्सकडे पोलिसांचे दुर्लक्ष

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन 

ज्यादा रक्कमेचे अमिष दाखवून मातृभूमी रिअल टच डेव्हलपमेंट लिमीटेड या फायनान्स कंपनीने पाटोदा गावातील गुंतवणूकदारांना ५४ लाख ९९ हजार ४९७ रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी बेंबळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊन सहा दिवस झाले तरी अद्याप पोलिसांनी कोणतीच कारवाई केलेली नाही.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3f72e8e5-beea-11e8-8263-45dc220f4806′]

मातृभूमी रिअल टच डेव्हलपमेंट लिमीटेड या फायनान्स कंपनीचे काम उस्मानाबाद येथील सुनिल प्लाझा येथून चालत होते. पाटोदा येथील लोकांना अक्काबाई भद्रे, सतीश हाके तसेच कंपनीचे चेअरमॅन प्रदीप प्रविण गर्ग, कार्यकारी संचालक संजय बिस्वास, मिलींद जाधव, डॉ. बी. एन. मिश्रा इत्यादींनी संगणमत करुन पोटादा येथील लोकांना जादा रक्कमेचे आमिष दाखवून रक्कम वसूल केली होती. मात्र, मुदत संपल्यानंतर कंपनीचे कार्यालय आता सील करण्यात आले आहे.

जीपीएस सिस्टीमद्वारे मिरवणूकीवर वॉच : पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम

तसेच पैसे परत मिळणार नाहीत, असे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. याविरोधात विक्रम शहाजी साठे यांनी काही लोकांसह मिळून बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मात्र, बेबंळी पोलीस ठाण्यात सहा दिवसांपासून तक्रार नोंदवली असूनही पोलिस दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करावी की बेंबळी पोलिसांनी करावी याबद्दल निश्चित झालेले नाही. पोलिसांकडून अशाप्रकारे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.