आता पोलिस कर्मचारी अन् अधिकारी म्हणतायेत – ‘साहेब, सांगा आम्ही काय काय करायचं’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना काळात पुणे पोलिसांनी केलेल्या कामाची व्हाव्हा मिळत असली तरी प्रत्यक्षात काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी आता “साहेब, सांगा आम्ही काय काय करायचं” असे दबक्या आवाजात बोलु लागले आहेत. कारण, महापालिकेचे मास्क न परिधान करणाऱ्यांवर कारवाईचे काम पोलीस करत आहेत. आता त्यात शाळेत जाऊन सर्व मुलांची माहिती देखील गोळा करायचे काम पोलिसांनाच देण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचारी वर्ग हैराण झाला आहे. काम नेमकी करायची काय-काय असा प्रश्न त्यांना पडला आहे.

देशात कोरोना आजाराने हाहाकार माजवला आहे. कोरोना काळात आरोग्य विभाग, पोलीस आणि पालिका कर्मचारी काम करत आहेत. पण सर्वाधिक जोखमीचे आणि जादा काम आरोग्य विभाग व पोलिसांकडे असल्याचे पाहिला मिळत आहे. पुण्यात कोरोना संसर्ग आटोक्यात येत नसल्याने शक्य ते प्रयत्न केले जात आहेत. त्यात आता सर्वाधिक लक्ष “मास्क न परिधान” करणाऱ्यांवर केले आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. खर हे काम पालिकेचे आहे. पण सध्या रस्त्या-रस्त्यावर पुणे पोलीस उभे राहून मास्क कारवाई करताना पहिला मिळत आहेत. दररोज हजारात कारवाई केली जात आहे. विशेष म्हणजे, पोलीस 24 तास गेल्या काही महिण्यापासून काम करत आहेत. त्यात कोरोनाची लागण देखील अनेकांना झाली आहे. पण “बरे होताच” पुन्हा कामावर येत पोलीस आपले “इमाने-इतबारे” काम करत आहेत. पण आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना पहाटे 4 वाजल्यापासून कारवाई करण्याची आदेश दिले आहेत. तसेच गर्दी होणारे ठिकाण, शासकीय व खासगी कार्यलये तसेच इत ठिकाणी ठोस व दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे पोलीस पहाटे पासूनच या कारवाईला सुरुवात करत आहेत. 8 दिवसात पोलिसांनी जवळपास 30 हजार नागरिकांवर कारवाई करत लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मास्कची दंडात्मक कारवाई सुरू असताना आता नवीन आणखी एक काम पोलिसांना देण्यात येत आहे. या कामाने पोलीस चकित झाले आहेत. कारण हे काम शिक्षण विभागाचे आहे. पण ते काम पोलिसांना दिले आहे.

विशेष शाखेने स्थानिक पोलिसांना पत्र पाठवले असून, याबाबत त्यात काही सूचना या कामाबद्दल दिल्या आहेत. त्यानुसार गरीब विध्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी सुविधा आहेत की नाही. त्यांच्याकडे मोबाईल, लॅपटॉप, टॅब आहेत का नाही हे पहावे असे म्हटले आहे. तसेच ऑनलाइन शिक्षण सुरू असताना सर्व विद्यार्थी असतात का, त्यात हजर किती गैरहजर किती आणि एकूण ऍडमिशन किती आहेत हे पहाण्यास सांगितले आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुले शाळेत जात नसताना शिक्षकांचा पगार देण्यासाठी शाळेकडून फी संदर्भात मागणी केली जाते का. आणि शाळा व कॉलेजकडून डोनेशन (देणगी) मागितली जाते का अशी माहिती काढण्यास सांगितली आहे.

त्यामुळे पोलीस डोक्याला हात लावून कामाचे नियोजन करत आहेत. तस पाहिल्यास एकीकडे शिक्षक गेल्या 7 महिन्यापासून घरी बसून आहेत. त्यांना हे काम न देता पोलिसांना दिल्याने कर्मचारी वर्गात नाराजी पसरली आहे.

पालिकेकडून पावती पुस्तके पोलिस ठाण्यात पाठविली जातात
पुणे पोलीस पालिकेने दिलेल्या मास्क बाबत पावत्या फाडत प्रत्येकी 500 रुपये दंड वसूल करत आहेत. पण पोलिसांना दररोज हे पावती पुस्तक ठाण्यात आणून दिले जातात. एका ठाण्यात जवळजवळ 3 ते 4 पुस्तके आणली जातात. त्यानंतर पोलीस कारवाई करून हिशोबासह पुस्तक पैसे पालिकेला देतात, अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली.