विनयभंगाची तक्रार खोटी असल्याचा पोलीस अधिकाऱ्याचा दावा

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन – खारघरमध्ये वास्तव्यास असलेले आणि पुणे येथे एमटी विभागात डीआयजी पदावर कार्यरत असलेले निशिकांत मोरे यांनी मुलीसोबत अश्लिल वर्तन केल्याचा आरोप सुखविंदरसिंग यांनी केले. मोरे आणि सुखविंदरसिंग यांचे सलोख्याचे संबंध असून पैशाच्या व्यवहारावरून हे आरोप करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तसेच सुखविंदर हे विनयभंगाची तक्रार करण्यासाठी तळोजा आणि खारघर पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तक्रार दाखल करुन घेत नसल्याने लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती मुलीच्या वडिलांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत मोरे यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की, सुखविंदर आणि आमचे घरोब्याचे संबंध होते. सुखविंदरने दोन फ्लॅट बुक केले होते असून त्यातील एक फ्लॅट पैसे नसल्याकारणाने घेऊ शकत नसून त्याच्या बुकिंगचे पैसे फुकट जातील म्हणून त्याने आम्हाला घेण्यास सांगितला. त्यावर माझ्या पत्नीने वीस लाख रुपये सुखविंदर यांना दिले. मात्र, बांधकाम बेकायदेशीर असून त्याला ना-हरकत प्रमाणपत्र देखील मिळालेले नसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुखविंदरकडे पैसे मागितले. पत्नी पैसे मागण्यासाठी गेली असता त्याने पत्नीला वाईट वागणूक दिली. त्यावेळी मी पुण्यात होतो. त्यावर एक माणुसकी ठेवत आम्ही तक्रार दाखल केली आहे. मात्र आता हे प्रकरण उलट्या दिशेने जात असून आजच नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार आणि राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना इमेलद्वारे सर्व हकीकत कळवली असल्याचे मोरे यांनी सांगितले.

डीआयजी मोरे आणि सुखविंदरसिंग यांच्यात आठ वर्षापूर्वी खारघरमध्ये ओळख झाली. त्यामुळे त्यांचे एकमेकांच्या घरी ये-जा करत असत. दरम्यान, जून महिन्यात सतरा वर्षाच्या मुलीचा वाढदिवसाच्या दिवशी निमंत्रण नसताना मोरे घरी आले. त्यांनी केक कापून मुलीच्या गालावर आणि शरीरावर केक लावून अश्लील वर्तन केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मोरे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप सुखविंदरसिंग यांनी केला आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/