पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात दुर्देवी मृत्यू

शिंदखेडा : पोलीसनामा ऑनलाईन

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज (मंगळवारी) पहाटे घडली आहे. राजेंद्र अंबर मोहीते (वय-45) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते सिंदखेडा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,  पोलीस कर्मचारी राजू मोहिते शिंदखेडा येथील आपले कर्तव्य पार पाडून दुचाकीने धुळ्याकडे निघाले होते. यावेळी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सोनगीर नजीक असलेल्या बाभळे फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मागील सहा महिन्यांपुर्वीच पोलीस मुख्यालयातून सिंदखेडा पोलीस स्टेशनला त्यांची बदली झाली होती.