हृदयविकाराच्या धक्क्याने पोलीस हवालदाराचा ‘ऑन ड्युटी’ मृत्यू

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – ऑन ड्युटी असलेल्या पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अंबिकाप्रसाद बद्रिप्रसाद यादव (वय-48 रा. पोलीस क्वॉर्टर) असे मृत्यू झालेल्या पोलीसाचे नाव आहे. यादव हे गाडगेनगर पोलीस ठाण्यात कर्यरत होते. काही दिवसांपूर्वीच ते वाहतूक शाखेतून बदली होऊन गाडगेनगर पोलीस ठाण्यात हजर झाले होते.
Ambikaprasad-Yadav

अंबिकाप्रसाद यादव चार वर्षापासून वाहतूक शाखेत कर्तव्यावर होते. महिन्याभरापूर्वी त्यांची बदली गाडगेनगर पोलीस ठाण्यात झाली. रविवारी रात्री पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असताना पहाटे साडेपाचच्या सुमारास अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागले. त्यावेळी पोलीस ठाण्यात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना दुपारी बाराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

अंबिकाप्रसाद यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मुलगा विशाल हा अमेरिका येथील कंपनीत आहे. तो मंगळवारपर्यंत अमरावतीमध्ये येणार असून त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या मृत्यूने पोलीस वर्तुळात शोककळा पसरली आहे.

यादव यांची गाडेगेनगर पोलीस ठाण्यात यापूर्वी दोनवेळा बदली झाली होती. गाडगेनगर पोलीस ठाण्यात कामाचा प्रचंड ताण असल्याचे यादव यांच्या सहकाऱ्यांना सांगितले होते. त्यांनी बदलीसाठी वरिष्ठांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना दोन महिने थांबण्यास सांगितले होते. कामाचा वाढता तणावामुळे ते मानसिक तणावात असल्याचे गाडगेनगर पोलीस ठाण्यात चर्चा सुरु आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like