धक्कादायक ! मध्यरात्री महिलेच्या घरात घुसले पोलिस, गोळी मारून घेतला जीव

वाशिंग्टन : वृत्तसंस्था – कृष्णवर्णीय महिलेच्या घरी तपासासाठी आलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने महिलेवर गोळ्या झाडल्याची घटना अमेरिकेतील टेक्सासमध्ये घडली आहे. या घटनेत 28 वर्षीय एटाटिआना कोकीस जोफरसन या महिलेचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार घडल्यानंतर स्थानिक पोलिसांनी संबंधीत पोलीस अधिकाऱ्याला सक्तीच्या सुट्टीवर पाठवले असून त्या अधिकाऱ्याचे नाव जाहीर केले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, शनिवारी पाहाटे अडीचच्या सुमारास मृत महिलेच्या घराचा दरवाजा शेजारी राहणाऱ्या 62 वर्षीय जेम्स यांना उघडा दिसला. त्यांनी याची माहिती आपत्कालीन विभागाला दिली. त्यावेळी आपत्कालीन विभागातील स्थानिक अधिकाऱ्यांनी एका अधिकाऱ्याला चौकशी करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवून दिले. तपासासाठी आलेल्या अधिकाऱ्याने तिला गोळ्या घातल्या. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला.

घटनेनंतर जेम्स यांनी सांगितले की, दरवाजा उघडा असल्याने मला संशय आला. कारण जेफरसन सोबत 8 वर्षाची तिची पुतणी सोबत असायला हवी होती. घडेलेल्या प्रकारामुळे आपण स्वत:ला दोषी असल्याचे वाटत आहे. कारण मी जर फोन केला नसता तर कदाचित जेफरसन जिवंत असली असती. दरम्यान, पोलिसांनी एक व्हिडीओ फूटेज प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये पोलीस हात वर करण्यास सांगत असल्याचे व्हिडोमध्ये दिसत आहे. त्यानंतर संबंधीत अधिकाऱ्याने गोळी झाडली.

Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like